पुरुषांमध्येही वाढतोय स्तनांच्या कॅन्सरचा धोका, पाच वर्षात 21 टक्क्यांची वाढ

पुरुषांमध्येही वाढतोय स्तनांच्या कॅन्सरचा धोका, पाच वर्षात 21 टक्क्यांची वाढ

'अशा प्रकारचा आजार हा आपल्याला होऊच शकत नाही असं पुरुषांना वाटत असतं. त्यामुळे डॉक्टरांना दाखविण्याचं टाळलं जातं. मात्र त्यामुळे धोका हा जास्त वाढतो.'

  • Share this:

मुंबई 09 मार्च : स्तनांचा कॅन्सर (breast cancer) हा फक्त स्त्रियांनाच होऊ शकतो असं जमजलं जाते. मात्र या कॅन्सरचं प्रमाण हे पुरुषांमध्येही वाढत असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलने याबाबत जी माहिती दिली त्यात हे दिसून आलं असून गेल्या 5 वर्षात पुरुषांमध्ये तब्बल 21 टक्क्यांनी स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरच्या तुलनेत याचं पुरुषांमधलं प्रमाण हे फक्त 1 टक्का आहे. मात्र त्यात झपाट्याने वाढ होत आहे. अशा प्रकारचा आजार हा आपल्याला होऊच शकत नाही असं पुरुषांना वाटत असतं. त्यामुळे डॉक्टरांना दाखविण्याचं टाळलं जातं. मात्र त्यामुळे धोका हा जास्त वाढतो अशी माहितीही डॉक्टरांनी दिलीय.

यावर वेळीत उपचार मिळाले तर ते प्रमाण कमी होतं अशी माहितीही डॉक्टरांनी दिलीय. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही स्तनांमध्ये गाठी येतात. तो भाग आक्रसला जातो. त्या भागात भेगा पडतात. थोडं दुखायला लागतं. हाताला गाठ असल्याचं जाणवतं अशी लक्षणे असतात. त्यातून कॅन्सर तयार होतो. जेवढ्या लवकर यावर उपचारप सुरु होतील तेवढ्या लवकर कॅन्सर बरा होतो. जेवढा उपचारासाठी उशीर होईल तेवढा त्रास वाढतो आणि तो हाताबाहेर जाण्याचा धोका असतो.

आता यावर चांगलं संशोधन झालं असून प्रगत उपचारही उपलब्ध आहेत. मात्र आजार जर शेवटच्या टप्प्यात असेल तर मग उपचारही परिणामकारक होऊ शकत नाहीत.

आपल्याला अशी गाठ आहे हे सांगण्यास पुरुष लाजतात किंवा त्यांना कमीपणा वटातो असं निरीक्षणही डॉक्टरांनी नोंदवलं आहे. सध्याची जीवनशैली, वाढतं प्रदुषण, खाण्यापीण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव किंवा अनुवांशिक कारणांमुळे कॅन्सरचा धोका जास्त असतो. त्यामुळे कुठलीही शक्यता वाटतल्यास किंवा शंका आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही तज्ज्ञांनी सुचवलं आहे.

हेही वाचा...

कमी झोप आरोग्यासाठी धोक्याची घंटा, 'या' गंभीर आजाराला मिळतंय आमंत्रण

तुम्ही स्मोक करत नसाल तरीही तुमचं आरोग्य धोक्यात, वाचा काय आहे नेमकं कारण

तुम्ही चुकीच्या वेळी तर बदाम खात नाहीत ना? 'ही' आहे बदाम खाण्याची योग्य वेळ

 

First published: March 9, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या