एकापेक्षा दुसऱ्या Breast चा आकार मोठा, Cancer चं लक्षण तर नाही ना?

एकापेक्षा दुसऱ्या Breast चा आकार मोठा, Cancer चं लक्षण तर नाही ना?

तुमचे ब्रेस्ट (Breast) नेमके कसे असतात हे समजल्यानंतर त्यातील बदल जाणून घेणं तुम्हाला सोपं होईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : सध्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत (Breast cancer) महिला जागरूक झाल्यात. त्यामुळे आपल्या ब्रेस्टमध्ये (Breast) काही बदल तर झाले नाहीत ना, यासाठी महिला घरच्या घरी आपल्या ब्रेस्टची तपासणी करतात. ब्रेस्टला हात लावून कुठे गाठ तर लागत नाही ना? ब्रेस्टचा आकार तर बदलला नाही ना? हे पाहतात. आरशात पाहिल्यानंतर आपल्या एका ब्रेस्टचा आकार दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा मोठा दिसला की महिलांना प्रश्न पडतो आपल्याला कॅन्सर तर नाही ना?

ब्रेस्ट कॅन्सरचं लवकरात लवकर निदान होण्यासाठी आपल्या ब्रेस्टमध्ये होणारे बदल समजायला हवेत आणि यासाठी महिलांना आपले ब्रेस्ट नेमके कसे असतात हे माहिती असायला हवं. तुमचे ब्रेस्ट नेमके कसे असतात हे समजल्यानंतर त्यातील बदल जाणून घेणं तुम्हाला सोपं होईल. असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 'वेब एमडी'ने दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्टमध्ये खालीलप्रमाणे बदल होत असतात.

सामान्य ब्रेस्ट

तुमच्या दोन्ही ब्रेस्टचा आकार एकमेकांपेक्षा थोड्याप्रमाणात वेगळा असतो.

एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा थोडा खालच्या बाजूला असतो.

निपलभोवती केस असतात

मासिक पाळी

मासिक पाळी येण्याआधी आणि मासिक पाळीत ब्रेस्टमध्ये वेदना होतात

ब्रेस्ट जड वाटू लागतात

हेदेखील वाचा - पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ कॅन्सरचा सर्वाधिक धोका, लक्षणांबाबत माहिती असू द्या

प्रेग्नन्सी

प्रेग्नन्सीत ब्रेस्ट मोठे होतात

निपलचा रंग गडद होतो

ब्रेस्टमधील रक्तवाहिन्या दिसू लागतात

एखादा फोड किंवा ट्युमरही असू शकतो मात्र तो कॅन्सरचा असेलच असं नाही.

स्तनपान

प्रसूतीनंतर स्तनांना सूज येते

स्तन जड झाल्यासारखे वाटतात

मात्र बाळाला दूध दिल्यानंतर स्तन हलके होतात

बाळाला दूध देणं थांबल्यानंतर ब्रेस्टमधून येणारं दूध काही दिवसांनी आपोआप बंद होतं.

ब्रेस्टफिडिंग करताना निपलला सूज येते, निपल क्रॅक होतात.

हेदेखील वाचा - तारुण्य ते म्हातारपण, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असा असावा महिलांचा आहार

वयाच्या चाळीशीनंतर

वाढत्या वयात शारीरिक बदल होतात

दूध बनवणाऱ्या ग्रंथी आकुंचित पावतात.

त्याठिकाणी नव्या फॅट टिश्यूंची निर्मिती होते

ब्रेस्ट जास्त सैल होतात आणि खाली येतात.

वय वाढलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो.

मात्र याव्यतिरिक्त जर तुमच्या ब्रेस्टमध्ये खालील बदल जाणवले तर मात्र चिंतेचं कारण आहे.

ब्रेस्टवर अचानक एखादी गाठ येणं

ब्रेस्टभोवती, काखेजवळ सूज येणं

निपलभोवतालची त्वचा कोरडी, लाल आणि जाड होणे.

निपलमधून रक्तस्राव किंवा दुधाव्यतिरिक्त इतर एखादा द्रव बाहेर पडणे

ब्रेस्ट उबदार होणे, ब्रेस्टला खाज येणे

ही लक्षणं म्हणजे गंभीर समस्येचं कारण असेलच असं नाही, मात्र हे सर्वसामान्य असे बदल नाहीत त्यामुळे डॉक्टरांना जरूर भेटा. एखादं इन्फेक्शन असल्यास त्यावर उपचार होतील मात्र कॅन्सरचंही लक्षण असल्यास वेळीच त्याचं निदान होऊन त्याच्यावर उपचार करता येतील.

हेदेखील वाचा - तारुण्य ते म्हातारपण, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असा असावा महिलांचा आहार

First published: February 20, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या