Breast Cancer Awareness Month: जाणून घ्या Breast Cancer ची लक्षणं, ब्रेस्टमध्ये होतात हे गंभीर बदल

स्तन हा महिलांच्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ब्रेस्ट टिश्यूच्या माध्यमातून दूध तयार होतं. हे टिश्यू डक्टच्या मार्फत निप्पलशी जोडलेले असतात.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 10:23 AM IST

Breast Cancer Awareness Month: जाणून घ्या Breast Cancer ची लक्षणं, ब्रेस्टमध्ये होतात हे गंभीर बदल

ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ (Breast Cancer Awareness Month): 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ राबवण्यात येणार आहे. या संपूर्ण महिन्यात लोकांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूक करण्यात येणार आहे. तसेच या कर्करोगाची लक्षणं आणि त्यावरील उपाय यांच्याबद्दल योग्य ज्ञान दिलं जाणार आहे. भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आहेत. स्तन हा महिलांच्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ब्रेस्ट टिश्यूच्या माध्यमातून दूध तयार होतं. हे टिश्यू डक्टच्या मार्फत निप्पलशी जोडले गेलेले असतात. स्तनाचा कर्करोग हा जास्तीत जास्त छोट्या कॅल्शिफिकेशनच्या जमण्याने किंवा स्तनाच्या टिश्यूत गाठ झाल्याने होतो. यानंतर या गाठी वाढून कर्करोगाचं रूप घेतात.  mayoclinic नुसार स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं जाणून घेऊ.

- स्तनाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण म्हणजे स्तनात गाठी तयार होतात. याशिवाय काही महिलांमध्ये आजूबाजूचे काही टिश्यू एकत्र होतात आणि त्यांचा आकार वाढतो. हा आकार स्पर्श केल्यावरही जाणवू लागतो.

-या रुग्णांच्या स्तनाच्या आकारातही बदल होतो. सुरुवातीला आकारात झालेला बदल जाणवत नसला तरी नंतर तो स्पष्ट रुपाने जाणवू लागतो.

-याशिवाय स्तनाजवळच्या त्वचेतही बदल झालेले दिसून येतात. स्तनावर खड्डे (डिंपल) झाल्यासारखं झालेलं दिसून येतं.

- स्तनाचा कर्करोग झालेल्या काही महिलांच्या निपलचा आकार बदलतो आणि ते उलट्या दिशेला वाढू लागतात.

Loading...

निप्पल किंवा हाडाच्या आसपासच्या त्वचेजवळ पापुद्रे यावेत तशी त्वचा होते.

- स्तनाजवळची त्वचा लाल आणि नारंगी रंगाची होऊ लागते.

दररोज लग्नाचा ड्रेसच घालते ही महिला, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

अतीशहाणपणा नडला! सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली महिला, पाहा हा VIRAL VIDEO

देशातल्या पहिल्या 'टॉयलेट कॉलेज'मधून उत्तीर्ण झाले 3 हजाराहून जास्त लोक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...