ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर स्त्रियांनी लावून घ्यायला हवी 'ही' सवय

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर स्त्रियांनी लावून घ्यायला हवी 'ही' सवय

ज्या महिलांना सकाळी लवकर उठण्याची सवय आहे त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचं Breast Cancer चं प्रमाण कमी दिसतं.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : बदलत्या जीवनशैलीसोबतच माणसाच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही भरपूर बदल झाले आहेत. प्रक्रिया केलेलं अन्न आणि रोजच्या जेवणातील फरकांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्याचसोबत कर्करोगाचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. काही जुन्या लोकांनी असं म्हटलं आहे की, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”. हे अगदी खरं आहे कारण, सकाळी उशीरा उठण्याच्या सवयीमुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. एका अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे की, ज्या महिलांना सकाळी लवकर उठण्याची सवय आहे त्यांमध्ये स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) काही प्रमाणात कमी होतो. ही माहिती ‘यूके बायोबँक स्टडी अ‍ॅण्ड ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन कन्सोर्टियम (बीसीएसी) स्टडी’ मध्ये जवळपास चार लाख महिलांचं निरीक्षण करण्यात आलं.

चालण्या-धावण्यापेक्षा 'हा' व्यायाम ठरतो निरोगी हृदयासाठी परिणामकारक

मेंडेलियन रँडमाइझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करत अभ्यासकांनी झोपेच्या तीन वेगळ्या प्रकारांवर म्हणजेच सकाळी आणि रात्रीची झोप, झोपण्याची वेळ आणि निद्रानाश या घटकांवर निरीक्षण केलं. या निराक्षणात अशी माहिती समोर आली की, ज्या महिला सकाळी लवकर उठतात त्यांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी आहे.

ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन कन्सोर्शियममध्ये दिलेल्या माहितीनुसार 7 ते 8 तासांची झोप शरीराकरीता पुरेशी आहे. तेवढी झोप आवश्यक आहे. पण त्यासाठी लवकर झोपावं आणि लवकर उठावं. याचा फायदा स्त्रियांना मोठ्या वयात होईल.

हा पदार्थ नियमित खाल्ल्याने पुरुषांना फायदा; कर्करोगाचा धोका होईल कमी!

महिलांची मासिक पाळी सुरू असेपर्यंत कर्करोगाचा धोका कमी असतो. त्यानंतर स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लाईफस्टाईलमध्ये बदल करत लवकर निजून लवकर उठायची सवय लावून घ्यायला हवी.  त्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होईल.

VIDEO: गोदावरी नदीपात्रात फेसाळ पाणी, प्रशासनाचं दुर्लक्ष

First published: July 10, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading