मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Breakfast For Weight Loss: सकाळच्या नाश्त्यात घ्या या गोष्टी; वजन वाढणार नाही, दिवसभर रहाल एकदम फ्रेश

Breakfast For Weight Loss: सकाळच्या नाश्त्यात घ्या या गोष्टी; वजन वाढणार नाही, दिवसभर रहाल एकदम फ्रेश

Breakfast For Weight Loss: रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी नाश्ता करेपर्यंत मध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतो. पण, बरेचजण ज्यांना वजन कमी (Weight loss) करायचे असते, ते सकाळचा (Breakfast For Weight Loss) नाश्ता टाळतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 जानेवारी : सकाळचा नाश्ता (Breakfast) चांगला भरपेट घेतला पाहिजे आणि शक्यतो न्याहारीमध्ये पौष्टिक (Nutritious) गोष्टी खाव्यात, असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. चांगल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी नाश्ता करेपर्यंत मध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतो. पण, बरेचजण ज्यांना वजन कमी (Weight loss) करायचे असते, ते सकाळचा (Breakfast For Weight Loss) नाश्ता टाळतात. नाष्टा केल्याने वजन वाढेल, अशी लोकांना भीती असते. पण तसे होत नाही.

ही भीती दूर करून नाश्त्यामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश का करू नये, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. तसेच वजन कमी करण्याचा तुमचा उद्देशही पूर्ण होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.

दही सर्वोत्तम पर्याय

सकाळच्या नाश्त्यात दही घेऊ शकता. दही पोषक तत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते चांगली भूमिका बजावते. दही खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. यासोबतच यामध्ये असलेले कॅल्शियम तुमची हाडे मजबूत करण्याचे काम करते.

हे वाचा - रेल्वेमध्ये साहित्य विसरलंय का? इकडे-तिकडे फिरू नका; रेल्वेच्या साईट Mission Amanat वर शोधा

उपमा

तुम्ही नाश्त्यात उपमाचाही समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. उपमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्ही पुन्हा-पुन्हा काहीही खात नाही. यासोबतच उपमा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

मूग चीला खा

मूग डाळ आपले वजन कमी करण्यात चांगली भूमिका बजावते. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यासोबतच मुगाच्या डाळीमध्ये भरपूर फायबर असतात, जे तुमचे पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. यासोबतच यामध्ये भरपूर प्रोटीन देखील असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये मूग डाळीचा समावेश करू शकता.

हे वाचा - Makar Sankranti: 29 वर्षांनंतर शनि-सूर्याचे होतंय मीलन; संक्रातीनंतर या 4 राशींचे भाग्य चमकणार

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips