मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ब्राझीलला हवीये मेड इन इंडिया कोरोना लस; राष्ट्रपती बोल्सोनारोंची PM मोदींना कळकळीची विनंती

ब्राझीलला हवीये मेड इन इंडिया कोरोना लस; राष्ट्रपती बोल्सोनारोंची PM मोदींना कळकळीची विनंती

ब्राझीलचे (Brazil) राष्ट्रपती जायर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi)  पत्र लिहिलं आहे. 

ब्राझीलचे (Brazil) राष्ट्रपती जायर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi)  पत्र लिहिलं आहे. 

ब्राझीलचे (Brazil) राष्ट्रपती जायर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi)  पत्र लिहिलं आहे. 

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 10 जानेवारी : भारतात दोन कोरोना लशींना (Covid-19 Vaccine) आपात्कालीन मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष आता भारताकडे लागलं आहे. भारताकडून कोरोना लस मिळणार या प्रतीक्षेवर सर्वजण आहेत.  अशात ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी भारताच्या पंतप्रधानांकडे लशीसाठी कळकळीची विनंती केली आहे. भारतानं (India) ब्राझीलला (Brazil) कोरोना लशीचे 20 लाख डोस तात्काळ द्यावेत अशी मागणी केली आहे.

भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या (serum institutr of india) कोव्हिशिल्ड (covishield) आणि भारत बायोटेकच्या (bharat biotech) कोवॅक्सिनला (Covaxin) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.  ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Prime Minister Narendra Modi)  पत्र लिहिलं आहे.

अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत.  देशात आतापर्यंत 80,15,920 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  2,01,542  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या शेजारील देशांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी दबाव वाढतो आहे. आमच्या देशातील लसीकरण कार्यक्रम सुरू व्हावा यासाठी भारतानं आमची मदत करावी. भारतानं आम्हाला कोरोना लशीचे 20 लाख  डोस द्यावेत.

हे वाचा - PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना मात देण्यासाठी ममत बॅनर्जींची मोठी घोषणा

ब्राझीलची सरकारी संस्था फिओक्रूज बायोमेडिकल सेंटर अॅस्ट्राझेनकाची लस तयार करतं आहे.  यासाठी आवश्यक असलेले प्रोडक्ट शनिवारपर्यंत मिळण्याची आशा होत पण आता ते या महिन्याच्या अखेर मिळेल. त्यामुळे ब्राझीलनं आता भारतासमोर हात पसरले आहेत.

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी कोविड (Covid-19) लसीकरणासाठी राज्य/केंद्र शासित प्रदेशांना तयारीसाठी एक उच्च-स्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहून संबोधित केलं. ज्यामध्ये कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिव यांच्याव्यतिरिक्त इतर अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीनुसार, 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. सर्व राज्यात यापूर्वीच कोरोना लशीचे ड्राय रन सुरू आहेत.

हे वाचा - कोरोनानं वडिलांचं छत्र हरपलं; आई पॉझिटिव्ह, भीतीनं तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाईल. ज्याची सर्वसाधारण संख्या तब्बल 3 कोटी आहे. यानंतर 50 हून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजाराशी मुकाबला करणाऱ्यांना लस दिली जाईल. ज्यात साधारण 27 कोटी लोकांचा सहभाग आहे. सूचना कार्यालयाकडून (PIB) उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने मकरसंक्रांत, पोंगल आदी सणांनंतर लसीकरणाचं अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Narendra modi