Home /News /lifestyle /

पर्यावरण संरक्षणासाठीचा अजब फंडा! सायकवरून विवस्त्र फिरतं हे जोडपं

पर्यावरण संरक्षणासाठीचा अजब फंडा! सायकवरून विवस्त्र फिरतं हे जोडपं

पर्य़ावरण रक्षणासाठी कोणी आपल्या जीवनशैलीत बदल करून पर्यावरण प्रदूषण कमीत कमी होईल, याचा प्रयत्न करतं. कोणी जनजागृती करतं. पण या जोडप्याने भलताच मार्ग अपलंबला आहे.

ब्राझिलिया, 16 सप्टेंबर: पर्यावरण संरक्षणासाठी (Environment activist) काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपापली अशी एक कार्यपद्धती असते. कोणी झाडं लावतं, तर कोणी पाणी वाचवतं. कोणी आपल्या जीवनशैलीत बदल करून पर्यावरण प्रदूषण कमीत कमी होईल, याचा प्रयत्न करतं. कोणी जनजागृती करतं. हे सगळं तुम्ही पाहिलं असेल; पण कोणी स्वतःचे कपडे काढून पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? Climate Change बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी एका जोडप्याने भलताच फंडा अवलंबला आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) राहणाऱ्या (Brazil Couple cycling naked for environment) आर्थर आणि लुआना या कपलने Climate Change Awareness अर्थात हवामानबदलासंदर्भात नागरिकांना जागृत करण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. ग्रीन एरियामध्ये ते विवस्त्र अवस्थेत सायकलिंग करतात आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी जागृती करतात. पर्यावरण संरक्षणासाठी (Environment) नागरिकांना जागृत करण्याची ही आमची पद्धत आहे, असं हे ब्राझिलियन दाम्पत्य म्हणतं. VIDEO: तुम्ही वापरताय तो गूळ रसायनयुक्त आहे की निर्भेळ? गुळातला फरक कसा ओळखायचा आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवशी हे दाम्पत्य सायकवरून विवस्त्रावस्थेत (Naked Cycle Trip) सैर करायला निघालं. ग्रीन एरियामध्ये फिरणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाहिल्यावर ते एकदम आश्चर्यचकितच झाले. हे नेमकं काय चाललं आहे, हा काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते, असं ते दाम्पत्य म्हणतं. नागरिक जेव्हा त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतात, तेव्हा हे दाम्पत्य तिथे थांबतं आणि त्यांच्या हवामानबदलासंदर्भात (Climate Change) गप्पा मारतं. पर्यावरणाचं संरक्षण करणं किती आवश्यक असून, सध्या पृथ्वीवर काय सुरू आहे, याची माहिती हे दाम्पत्य त्या नागरिकांना देतं. एरव्ही कोणाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधणं तितकंसं सोपं नाही, असं आर्थर म्हणतात. त्यामुळे शहरात विवस्त्रावस्थेत फिरून हे दाम्पत्य नागरिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचं मुख्य काम करतं. त्यानंतर एकदा नागरिकाचं लक्ष वेधलं गेलं, की त्यांना आपला उद्देश सांगून, पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न हे दाम्पत्य करतं. Mission Inspiration: चार सामान्य नागरिक अंतराळ सफरीवर, पाहा PHOTOs आर्थर ( Arthur O Urso) आणि लुआना (Luana Kazaki) हे दोघेही OnlyFans या अॅडल्ट फोटो सेलिंग साइटवर मॉडेल आहेत. तिथे आपले बोल्ड फोटोज विकून हे दाम्पत्य दर महिन्याला जवळपास 41 लाख रुपयांची कमाई करतं. त्यामुळे विवस्त्रावस्थेत बाहेर फिरणं हे त्यांना फारसं कठीण गेलं नसावं. हे दाम्पत्य सांगतं, की गेल्या काही महिन्यांपासून ते घरातल्या कचऱ्यातल्या गोष्टींचा पुनर्वापर करण्याची कला शिकत आहेत. हे फारसं कठीण काम नाही, असं ते म्हणतात. यापूर्वी ब्राझीलमधल्या साओ पाउलो इथे एका नव्या प्रोजेक्टवेळी हे कपल अत्यंत कमी कपड्यांत उपस्थित होतं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा घेऊन ते युरोप दौराही करू इच्छितात.
First published:

Tags: Brazil, Climate change, Environment

पुढील बातम्या