मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एकाच मुलीवर जडला 2 बेस्ट फ्रेंडचा जीव; 'गुंडे'वाली लव्ह स्टोरीत प्रत्यक्षात; क्लायमॅक्स तुम्हीच वाचा

एकाच मुलीवर जडला 2 बेस्ट फ्रेंडचा जीव; 'गुंडे'वाली लव्ह स्टोरीत प्रत्यक्षात; क्लायमॅक्स तुम्हीच वाचा

फोटो सौजन्य - Jam Press

फोटो सौजन्य - Jam Press

रिअल लाइफमधील अशा लव्हस्टोरीचा क्लायमॅक्स काय असेल याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना?

ब्राझील, 02 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकानं गुंडे (gunday) फिल्म पाहिली आहे. या फिल्ममधील लव्हस्टोरी (Love story) थोडी हटकेच आहे. दोन बेस्ट फ्रेंड असलेल्या हिरोंना एकच हिरोईन आवडते आणि दोघंही तिच्या प्रेमात पडतात. दोघांनीही एकमेकांच्या या प्रेमाबाबत माहिती असते, शिवाय हिरोईनीलादेखील याची कल्पना असते. त्यानंतर पुढे काय होतं हे तुम्ही फिल्ममध्ये पाहिलंच आहे. पण अशीच लव्हस्टोरी रिअल लाइफमध्ये झाली तर...

गुंडेवाली ही फिल्मी लव्हस्टोरी प्रत्यक्षातही घडली. दोन मित्रांचा एकाच मुलीवर जीव जडला. पण रिअल लाइफमधील अशा लव्हस्टोरीचा क्लायमॅक्स काय असेल याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना?

आज तकच्या रिपोर्टनुसार, ही लव्हस्टोरी आहे ब्राझीलमधील. ब्राझीलमधील 30 वर्षांचा डिसोन डिसूजा आणि सॉलो गोम्स गेल्या वर्षी स्पेनच्या बार्सिलोनामध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले. तिथं त्यांची ओळख 27 वर्षाच्या ओल्गासह झाली. डिनो आणि सॉलो दोघंही एकत्र ओल्गाकडे गेले. ओल्गा दोघांनाही आवडली आणि दोघंही ओल्गाला आवडले.

डिनोनं सांगितलं, "की स़ॉलो आणि मी बार्सिलोना फुटबॉल मॅट पाहण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्हाला ओल्गा बेटली. आम्ही तिला ड्रिंक्ससाठी विचारलं आणि इथूनच आमची कहाणी सुरू झाली. आम्ही तिघं रिलेशिनशिपमध्ये आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आमची केमिस्ट्री आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आमच्या तिघांमध्येही खूप स्ट्रॉंग केमिस्ट्री आहे."

हे वाचा - सहन नाही झालं जोडीदाराच्या विरहाचं दुःख; म्हणून त्यानं चक्क 'रेल रोको' केलं!

या अशा विचित्र रिलेशनशिपमुळे तिघांनीही खूप ऐकावं लागलं. त्यांच्या या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. पण हळूहळू इतरांनीही त्याचा स्वीकार केला.

डिनो म्हणाला, "सुरुवातीला आम्हाला मित्रमैत्रिणी, नातेवाईकांकडून अनेक मेसेज आले. आमच्यात नेमकं काय चाललं आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. कारण आमचं रिलेशन समजण्यापलीकडचं होतं. परिस्थितीच वेगळी होती. आम्ही त्या सर्वांना आमच्याबाबत सर्वकाही खरं सांगितलं. आता आमच्याबाबत त्यांची असलेली मतंही बदलली आहेत. तेदेखील आम्हाला पाठिंबा देतात"

गेल्या दीड वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता तिघंही फ्रान्समध्ये राहतात. अगदी भविष्यकाळातील योजनाही त्यांनी बनवली आहे.

हे वाचा - VIDEO - विजेच्या तारेवर तडफडत होतं कबूतर; वाचवण्यासाठी त्याने लावली जिवाची बाजी

"फक्त एकत्र रिलेशनशिपच नव्हे तर त्यांनी मुलांचंही प्लॅनिंग केलं आहे. आम्हाला पूर्ण जग फिरायचं आहे आणि आमचा बिझनेस वाढवायचा आहे. अगदी सर्वसामान्यपणे आम्हाला जीवन जगायचं आहे", असं डिनोनं सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Love story, Relationship, World news