मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Optical Illusion : या फोटोत दडलेलं रहस्य शोधणं आहे अगदी सोपं, ट्राय तर करुन पाहा

Optical Illusion : या फोटोत दडलेलं रहस्य शोधणं आहे अगदी सोपं, ट्राय तर करुन पाहा

Brainden.Com/Sandro Del Prete

Brainden.Com/Sandro Del Prete

ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांची एक प्रकारची फसवणूक असते. या फोटोंमध्ये दिसणारे चित्र तुम्हाला विचार करण्यास भाग पाडते. एका चित्रांत अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्यात तुम्हाला शोधायला सांगितल्या जातात.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 14 ऑगस्ट : सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक फोटो पाहिले असतील ज्यात जे रहस्यांनी भरलेले असतात आणि त्यात तुम्हाला काहीतरी शोधण्यास सांगितले जाते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटले जाते. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांची एक प्रकारची फसवणूक असते. या फोटोंमध्ये दिसणारे चित्र तुम्हाला विचार करण्यास भाग पाडते. एका चित्रांत अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्यात तुम्हाला शोधायला सांगितल्या जातात. काही लोकांच्या मते या ऑप्टिकल इल्यूजन चित्रांमुळे आपल्या मेंदूचा आणि डोळ्यांचा व्यायाम होतो. कारण यातील गोष्ट शोधण्यासाठू तुम्हाला मेंदूर जोर द्यावा लागतो आणि नजर देखील एकाग्र करावी लागते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक चित्र घेऊन आलो आहेत. यात तुम्हाला प्रथमदर्शी एका माणसाचा चेहरा दिसू शकतो. परंतु तुम्हाला त्यात लपलेली मुलगी शोधायची आहे. तुम्ही हा फोटो पाहिल्यास तुम्हाला अनेक झाडी, जंगले, पर्वत आणि झुडपे दिसतात. हे चित्र अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की त्यात एक दाढीवाला माणूस देखील दिसतो. परंतु त्यात आणखी एक रहस्य दडलेले आहे. ते म्हणजे त्यात एक मुलगी लपलेली आहे. ती तुम्हाला शोधायची आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेले हे चित्र स्विस चित्रकार सँड्रो डेल प्रीटे यांनी बनवले आहे.

Banned product used in India: परदेशात बॅन पण भारतात या उत्पादनांची तुफान विक्री, कारण वाचून डोक चक्रावेल

ऑप्टिकल इल्यूजनची अशी काही फोटो आणि चित्रे ज्यात लपलेल्या गोष्टी शोधणे हे समुद्रात सुई शोधण्यासारखे आहे. परंतु तुमच्या समोर असलेले हे चित्र तेवढे अवघड नाही. तुम्ही थोडा जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला काही सेकंदात त्यातील मुलगी दिसू शकते. यासाठी तुमची दृष्टी तीक्ष्ण आणि तुमचे मन एकाग्र असायला हवे. असे असेल तर तुम्ही काही सेकंदात हे रहस्य शोधण्यात यशस्वी व्हाल.

सततच्या डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन ट्युमरची ‘ही’ सायलेंट लक्षणं वेळीच ओळखा

तुम्हाला अजूनही चित्रात लपलेली मुलगी दिसली नसेल तर काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला ती शोधण्यास मदत करू शकतो. चित्रात लपलेली मुलगी ही पाठमोऱ्या मुद्रेत बसलेली आहे आणि तिनेही गोल टोपी घातली आहे. आता तुम्ही एक नजर फोटोवर टाका आणि ती दिसते का बघा. अजूनही ती तुम्हाला सापडली नसेल तर आता आम्ही तुम्हाला याचा उत्तर सांगत आहोत. या चित्रातील मुलगी अगदी मध्यभागी आहे. चित्रात दिसणार्‍या दाढीवाल्या माणसाचे नाक पाहा, ती मुलगीच आहे.
First published:

Tags: Brain, Game, Lifestyle

पुढील बातम्या