मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनानंतर अनेकजण 'ब्रेन फॉग'मुळे आहेत त्रस्त; त्याची काय आहेत लक्षणं, अशी घ्यावी काळजी

कोरोनानंतर अनेकजण 'ब्रेन फॉग'मुळे आहेत त्रस्त; त्याची काय आहेत लक्षणं, अशी घ्यावी काळजी

Brain Fog Causes : मेंदूशी संबंधित समस्यांचा ग्रुपला 'ब्रेन फॉग' म्हटले जाते. ज्यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकारचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : जर तुम्ही अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला तुम्हीच बोलले स्वतःचे शब्दही लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर त्याला 'ब्रेन फॉग' (Brain fog) असे म्हणतात. ही वैद्यकीय संज्ञा नाही. सामान्यपणे या आजाराची अशी व्याख्या केली जाते. मेंदूशी संबंधित समस्यांचा ग्रुपला 'ब्रेन फॉग' म्हटले जाते. ज्यात स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकारचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. ही लक्षणे इतर अनेक संभाव्य आजारांमध्येही दिसून (Brain fog its causes symptoms and precautions) येतात. उदाहरणार्थ, कर्करोग आणि त्यात दिलेली केमोथेरपी, नैराश्य, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम. ब्रेन फॉगची समस्या गर्भधारणेदरम्यान देखील होऊ शकते.

कोरोनानंतर अनेकजण 'ब्रेन फॉग'मुळे आहेत त्रस्त; त्याची काय आहेत लक्षणं, अशी घ्यावी काळजी

हिंदुस्थान वृत्तपत्राच्या वृत्त अहवालातील एका संशोधनानुसार, कोरोनापासून बरे झालेल्या सुमारे 28 टक्के लोकांनी ब्रेन फॉग, मूड बदलणे, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.

ब्रेन फॉगची लक्षणे काय आहेत?

दिल्लीच्या उजाला सिग्नस हॉस्पिटलचे संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी या बातमीत सांगितले आहे की, ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, कोणत्याही कामात मन न लागणे, चिडचिड, नैराश्य, त्यांच्या आवडीच्या कामात रस नसणे, सतत डोकेदुखी, झोप नीट न येणे आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरणे अशी लक्षणे असतात. रक्त तपासणीत डॉक्टर ते शोधू शकतात. जसे की साखर किंवा थायरॉईडचे असंतुलन, मूत्रपिंडाचे (किडनी) खराब कार्य इत्यादी, किंवा कोणताही संसर्ग होणे किंवा शरीरात पोषक घटकांची कमतरता देखील ब्रेन फॉगचे कारण असू शकते.

ब्रेन फॉग का होऊ शकतो

- झोपेचा अभाव

- मोबाईल,डेस्कटॉप स्क्रीनवर अधिक वेळ घालवणे

- सेंट्रल नर्वस सिस्टमवर परिणाम करणारी समस्या, जसे मल्टीपल स्केलेरोसिस

- तसेच ज्या आजारांमध्ये शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये सूज येण्याची शक्यता असते किंवा रक्तातील साखरेची पातळी वर-खाली जाण्यास सुरुवात होते, त्यामुळे ब्रेन फॉगची स्थिती देखील असू शकते. जसे मधुमेह, हायपरथायरॉईड, नैराश्य, अल्झायमर आणि अशक्तपणा.

हे वाचा - VIDEO: आधी 4 जणांनी पकडून ठेवलं, मग…; लग्नात मेहुण्यांनी केलेले दाजीचे हाल पाहून लावाल डोक्याला हात

कर्करोग आणि केमोथेरपी

कर्करोगाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या केमोथेरपीमध्ये काही औषधे असतात, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तथापि, सहसा ही समस्या आपोआपच बरी होऊ शकते.

क्रॉनिक फटीग सिंड्रोम

तीव्र थकवा सिंड्रोम स्थिती 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकते. यामध्ये, व्यक्तीला मानसिक थकवा येतो, ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

औषधांचा प्रभाव

काही ठराविक औषधांच्या सेवनामुळे ब्रेन फॉगची समस्या देखील येऊ शकते. उदासीनता किंवा निद्रानाश यामध्ये दिलेली औषधे विचार आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.

हे वाचा - Petrol Price Today: आज पुन्हा वाढले इंधनाचे भाव, पेट्रोल 120 रुपये लीटर तर डिझेल 104 रुपयांवर

आहार आणि खबरदारी

अमीनो अ‌ॅसिड, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिडचा नियमितपणे आपल्या आहारात समावेश करा.

- दुपारी कॅफिनयुक्त पेये घेऊ नका.

- अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा.

- दररोज 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.

- नियमित व्यायाम करा.

लक्षणांचा अंदाज घेऊन तुम्ही एक्स -रे, सीटी स्कॅन, एमआरआय, अ‌ॅलर्जी चाचणी इत्यादीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

बऱ्याच प्रकरणांमध्ये औषधांसह थेरपीदेखील या समस्येचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

First published:

Tags: Brain, Health Tips