मेंदूलाही आवश्यक असतो व्यायाम, या 7 गोष्टी केल्या नाहीत तर होतील गंभीर परिणाम

मेंदूला व्यायाम मिळाला नाही, तर रोजचं काम करणंही अवघड होऊ शकतं. उतारवयात होऊ शकणारे विस्मरण, अल्झायमर सारखे आजार टाळायचे असतील तर मेंदूचे व्यायाम आवश्यक आहेत.

  • Share this:

मानवी मेंदू हा एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमसारखाच असतो. तुम्ही त्याला जितका जास्त नवा अनुभव द्याल तितका तो जास्त कार्यरत असतो.

मेंदूला खाद्य दिलं पाहिजे, नाहीतर तो गंजतो असं लोक म्हणतात ते खोटं नाही, हे मेंदूविज्ञानात संशोधन करणारे शास्त्रज्ञही मान्य करतात.

एखादं काम नियमितपणे त्याच त्या पद्धतीने केलं की, त्याची सवय होते. मेंदू त्यावर विशेष काम करत नाही. म्हणून सतत नवीन काम शिकायला हवं.

मेंदूचे हे 6 व्यायाम करून पाहा. मेंदूतली सुप्त असलेली सर्किट्स यामुळे कार्यरत होतील आणि मेंदूला चालना मिळेल.

आकडेमोडीसाठी कॅल्क्युलेटर न वापरता दिवसभरात एकदा तरी तोंडी आकडेमोड करून पाहा.

आठवड्यातून एकदा तरी सुडोकू किंवा एखादं शब्दकोडं सोडवून पाहा किंवा नवीन विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी वाचन करा.

नवीन कला शिकलीच पाहिजे. एखादं वाद्यसंगीत शिकलात तर उत्तम. नवीन वाद्य शिकता तेव्हा मेंदूतली एरवी वापरात नसलेली सर्किट उद्दिपीत होतात आणि तो एक उत्तम व्यायाम ठरतो.

तुम्ही स्वयंपाकघरात नेहमी तेच काम करत नसाल तर आवर्जून आठवड्यातून एकदा तुमच्या पद्धतीचा वेगळा स्वयंपाक करा. स्वयंपाकघरात रोजचा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांनी एक दिवस चेंज म्हणून काही वेगळा प्रयोग करा.

नवीन भाषा शिकणे किंवा नवीन कला शिकणे यासारखा दुसरा मेंदूचा व्यायाम नाही. पण त्यात सातत्य हवं.

मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे काम तुमच्यासाठी अवघड नसेल, तर उलटा मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एखादा ब्रेन गेम खेळणं फायदेशीर ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या