मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Brahmi Benefits: बुद्धी आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी ब्राह्मी आहे गुणकारी, जाणून घ्या सर्व फायदे

Brahmi Benefits: बुद्धी आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी ब्राह्मी आहे गुणकारी, जाणून घ्या सर्व फायदे

Brahmi Benefits : ब्राह्मी केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्राह्मीची पाने आणि तेलच नाही तर ब्राह्मीची फुले देखील खूप फायदेशीर (Brahmi Benefits ) मानली जातात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : ब्राह्मीबद्दल तुम्हाला माहीत असेल, केसांच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही अनेकदा ब्राह्मीची पाने आणि तेल वापरले असेल. मात्र, ब्राह्मी केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्राह्मीची पाने आणि तेलच नाही तर ब्राह्मीची फुले देखील खूप फायदेशीर (Brahmi Benefits ) मानली जातात.

केस आणि मेंदूच्या आरोग्यासोबतच (Brain Health) शरीराच्या इतर अनेक समस्या दूर करण्यासाठीही ब्राह्मी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया ब्राह्मीचे आरोग्यासाठी असणारे फायदे -

रोगप्रतिकारशक्ती वाढते

ब्राह्मीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. त्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. ब्राह्मीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

पचनसंस्था सुधारते

ब्राह्मी पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. ब्राह्मीच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते. ब्राह्मीमध्ये फायबर असते ज्यामुळे आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून टाकून पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित

ब्राह्मी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. यामुळे साखरेची पातळी योग्यरित्या नियंत्रित होते आणि हायपोग्लायसेमिया सारख्या समस्या कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

मानसिक ताण कमी

ब्राह्मीचे सेवन केल्याने मानसिक तणावही कमी होण्यास मदत होते. ब्राह्मीचा शीतल प्रभाव असतो ज्यामुळे हार्मोन्स संतुलित होते आणि तणाव कमी करण्यास मदत होते. ब्राह्मीमध्ये कोर्टिसोलची पातळी कमी करण्याचा गुणधर्म देखील आहे. त्याला स्ट्रेस हार्मोन असे म्हणतात. ब्राह्मी तेलाने डोक्याला मसाज केल्याने तणाव कमी होतो.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

तीक्ष्ण बुद्धी

ब्राह्मी बुद्धी तीक्ष्ण करण्यास देखील मदत करते. ब्राह्मीच्या सेवनाने बुद्धी तीक्ष्ण होते आणि एकाग्रताही वाढते. यासोबतच ब्राह्मी अर्काचे सेवन केल्याने स्मरणशक्तीही वाढते आणि विचार करण्याची क्षमताही वाढते. अल्झायमरच्या समस्येतही आराम मिळतो कारण त्यात अमायलोइड कंपाऊंड गुणधर्म असतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips