गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी समु्द्रातून सुसाट निघाला आणि थेट तुरुंगातच पोहोचला बॉयफ्रेंड

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी समु्द्रातून सुसाट निघाला आणि थेट तुरुंगातच पोहोचला बॉयफ्रेंड

गर्लफ्रेंडला (girlfriend) भेटण्यासाठी उतावळा झालेल्या या बॉयफ्रेंडला (boyfriend) समुद्र पार करणं चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:

एडिनबर्ग, 16 डिसेंबर : 'सात समंदर पार मे तेरे पिछे पिछे आ गई...' असाच काहीसा प्रयत्न स्कॉटलंडमधील (scotland) एका तरुणानं केला. त्याने गर्लफ्रेंडला (girlfriend) भेटण्यासाठी सात समुद्र (sea) नाही पण एक समुद्र पार केला आणि ते त्याला चांगलंच महागात पडलं आहे. समुद्रातून गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला उतावळा बॉयफ्रेंड (boyfriend) थेट तुरुंगात पोहोचला आहे.

28 वर्षांचा डेल मेक्लॉफलेन. त्याला गर्लफ्रेंडची खूप आठवण येऊ लागली. तिला भेटावंसं वाटू लागलं. तिला भेटण्यासाठी तो इतका उतावळा झाला की त्याला स्वतःला रोखता आलं नाही. त्यानं काही करून आपल्या गर्लफ्रेंडला भेटायचंच असं ठरवलं. त्याची गर्लफ्रेंड ऑइल ऑफ मॅन द्वीपवर राहत होती.

डेलनं कधीच वॉटर स्कूटर चालवली नाही मात्र समुद्रातून गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे म्हणून त्याने जेट स्कीची मदत घेतली. आयरिश समुद्र त्यानं पार केला आणि ऑइल ऑफ मॅन द्वीपवर तो पोहोचला. सप्टेंबरमध्ये त्याने या द्वीपवर काही मिळतील ती छोटीमोठी कामं केली. 14 दिवस आयसोलेट राहिल्यानंतर एक दिवस तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटला.

हे वाचा -  फक्त एक कप कॉफीमुळे गर्लफ्रेंडला समजलं बॉयफ्रेंडचं 'लफडं'; कसं ते वाचा

रिपोर्टनुसार डेल जेट स्कीच्या मदतीनं 40 किलोमीटर प्रवास केला. आपल्या गर्लफ्रेंडला घरी पोहोचला आणि त्यानंतर दोघंही नाइट क्लबमध्ये गेले होते. तिथं त्याची नीट चौकशी करण्यात आली. त्यानं आपली खोटी ओळख सांगितली. पण अखेर त्याचं खोटं समोर आलंच. त्यानं आपण बेकायदेशीररित्या इथं आल्याचं स्वीकार केलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. असं वृत्त आज तकनं दिलं आहे.

या द्वीपवर जाण्याचा डेलचा हा पहिला प्रयत्न नव्हता त्याने याआधीदेखील बरेच प्रयत्न केले. कायद्यानुसार इथं राहत नसलेले लोक फक्त विशेष परवानगी मिळाल्यानंतरच येऊ शकतात. मात्र डेलनं तशी कोणतीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्याने गुन्हा केला होता. ज्यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा ठेवण्यात आली. तब्बल चार आठवडे जेलमध्ये ठेवलं जाणार आहे.

हे वाचा - दहशतवाद्यांच्या बायका इस्रायली जेलमधून स्पर्म बाहेर कशा आणतात वाचून बसेल धक्का

डेलनं जाणूनबुजून द्वीपचे कायदे मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शिवाय कोरोना महासाथीच्या काळात त्यानं द्वीपवर राहणाऱ्या लोकांचाही धोका वाढवला आहे. दरम्यान डेलला डिप्रेशन आहे आणि त्यामुळेच त्याला आपल्या गर्लफ्रेंडला भेटायचं होतं, असं त्याच्या वकिलांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: December 16, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या