Home /News /lifestyle /

बॉयफ्रेंडच्या लग्नामुळे सुडानं पेटली गर्लफ्रेंड; नव्या नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस

बॉयफ्रेंडच्या लग्नामुळे सुडानं पेटली गर्लफ्रेंड; नव्या नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस

बॉयफ्रेंडनं (Boyfriend) दुसऱ्या मुलीशी लग्न करताच त्याच्या घरात घुसून गर्लफ्रेंडनं (girlfriend) अशा धक्कादायक पद्धतीनं बदला घेतला आहे.

    पाटणा, 02 डिसेंबर : आपला बॉयफ्रेंड (boyfriend) किंवा गर्लफ्रेंड (girlfriend) दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करणार आहे, याची साधी कल्पनाही सहन होत नाही. अशाच त्यांचं लग्न दुसऱ्यासोबत झालं तर मग काय कुणाचाही संताप होईलच. असाच संताप झाला तो बिहारमधील (bihar) एका तरुणीचा. तिच्या बॉयफ्रेंडचं दुसऱ्या मुलीशी लग्न होताच ती सुडाच्या भावनेनं पेटून उठली आणि थेट मध्यरात्री बॉयफ्रेंडच्या घरात घुसून नववधूच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं आणि तिचे केसही कापले. भागनबिगहामधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. नालंदा जिल्ह्यातील  मोरा तालाब गाव. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल राम नावाचा तरुण. ज्याचं 1 डिसेंबरला लग्न झालं. आपल्या नवविवाहित वधूला घेऊन तो आपल्या घरी गेला. त्याच्या गर्लफ्रेंडपर्यंत ही खबर पोहोचली आणि त्यानंतर तिचा स्वतःवरही ताबा राहिला नाही. तिनं बदला घेण्याचं ठरवलं. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली. ती त्याच्या बहिणीची मैत्रीण होती, त्यामुळे कुणालाही तिच्यावर संशय आला नाही. मध्यरात्री सर्वजण झोपल्यानंतर तिनं संधी साधली आणि तिचा बॉयफ्रेंड आणि त्याची नवविवाहित बायको ज्या रूममध्ये झोपले होते, त्या रूममध्ये घुसली. तरुणीनं या नववधूचे केस कापले इतकंच नव्हे त तिच्या डोळ्यात फेविक्वकही टाकलं. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये खासदाराची SEX PARTY; पोलिसांनी धाड टाकताच धूम ठोकण्याचा प्रयत्न नवऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार नववधू आपल्या पतीसह रूममध्ये झोपली होती. तिचा नवरा जसा बाहेर गेला तेव्हा संधी साधत ही तरुणी त्याच्या रूममध्ये घुसली. आरडाओरडा ऐकून आम्ही गेलो तेव्हा तिची अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला. तरुणीला नातेवाईकांनी पकडलं आणि तिलाही मारहाण केली. तरुणीदेखील जखमी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीला ताब्यात घेतलं आहे. तिनं नवरीच्या सासरच्यांनी आपल्याला बेदम मारहाण केली आणि गळ्यातील चेनही काढून घेतली, असा आरोप केला आहे. हे वाचा - Instagram वर फोटो शेअर करणं मॉडेलला पडलं महाग; दरोडेखोरांनी केली भयंकर अवस्था नववधूनं आपले दागिने लुटण्याचा आरोपही लावला आहे. तिनं सांगतिलं, तिला कुणीतरी बेशुद्ध केलं आणि तिचे सर्व दागिने लुटले, तिचे केस कापले.  जेव्हा ती उठली आणि डोळे धुतले तेव्हा तिचे डोळे उघडत नव्हते. डॉक्टरांनी कित्येक तासांच्या प्रयत्नांनंतर तिचे डोळे उघडण्यात यशस्वी झाले. सध्या ती ठिक असल्याची माहिती दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Relationship

    पुढील बातम्या