मुंबई, 10 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकानं हॉरर फिल्म (Horror film) पाहिली आहे. या फिल्ममध्ये आपण भूताची मान (Neck) 180 किंवा 360 डिग्रीमध्ये गोलगोल फिरल्याचंही पाहिलं आहे. असं फक्त फिल्ममध्येच होऊ शकतं, प्रत्यक्षात नाही. कारण आपल्या प्रत्येकाची मान डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली या चार दिशेला सहजपणे हलते. मात्र 180 किंवा 360 डिग्रीमध्ये फिरवणं शक्यच नाही. मात्र हे अशक्यही शक्य करून दाखवलं ते एका तरुणानं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.
काही लोकांकडे अशा कला असतात ज्या आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्या तरी त्यावर विश्वास बसत नाही. काहींचं शरीर इतकं लवचिक असतं की त्यात हाडं आहेत की नाही असाच प्रश्न पडतो. अगदी रबरासारखे ते कशीही हालचाल करू शकतात. अशाच एका तरुणाचा हा व्हिडीओ. @GaurangBhardwa1 ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
Khud ko Champ smjhte ho to ye karke dikhao pic.twitter.com/cRASbsdgR4
— Professor ngl राजा बाबू (@GaurangBhardwa1) December 8, 2020
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण समुद्रकिनाऱ्यावर बसला आहे. आधी तो आपली मान आपल्या डाव्या दिशेला वळवतो त्यानंतर दोन्ही हातात आपलं डोकं धरून तो फिरवतो. समोरील तोंड उचलून तो सहजपणे जणू पाठीवरच ठेवतो. त्याचं तोंड पाठीकडे वळतं. एखादी बनावट डोकं उचलून ठेवावं तसंच या तरुणानं आपलं खरं डोकं फिरवून ठेवलं आहे. आपण डोळ्यांनी पाहूनही यावर विश्वास ठेवू शकत नाही.
हे वाचा - OMG! शेकडो माशांना पुरून उरला बदल; एका घासासाठी कसा भिडला पाहा VIDEO
असं केल्यानंतर त्या तरुणाला कोणत्याही वेदना होताना दिसत नाही. त्याच्या चेहऱ्यांवर वेदनेची एकही रेघ दिसत नाही. तो अगदी हसताना दिसतो आहे. 'स्वतःला चॅम्प समजत असाल तर हे करून दाखवा', असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना देण्यात आलं आहे.
व्हिडीओ पाहून जसा तुम्हाला शॉक बसला तसाच कित्येकांना बसला. त्यांच्या प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. या ट्विटवर अनेकांनी कमेंट केले आहेत. कुणालाच यावर विश्वास बसत नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Videos viral, Viral