Home /News /lifestyle /

सलग 11 दिवस झोपला नाही 17 वर्षांचा मुलगा; शेवटी भयंकर परिणाम पाहून गिनीज वर्ल्डनेही स्टंट बॅन केला

सलग 11 दिवस झोपला नाही 17 वर्षांचा मुलगा; शेवटी भयंकर परिणाम पाहून गिनीज वर्ल्डनेही स्टंट बॅन केला

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात ११ दिवस बिलकुल न झोपणाऱ्या मुलाची झाली भयंकर अवस्था.

    वॉशिंग्टन, 04 जुलै : एखादी व्यक्ती फार फार तर किती दिवस झोपू शकणार नाही? एक, दोन, तीन दिवस? पण कुणी तब्बल 11 दिवस न झोपता राहणं शक्य आहे का? एका मुलाने तसा प्रयत्न केला (Boy world record without sleeping). त्याची गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंद झाली पण शेवटी त्याची अवस्था पाहून गिनीज वर्ल्डने या स्टंटवर बॅन आणला (Sleep world record). अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील 17 वर्षांच्यां रँडीने 11 दिवस न झोपण्याचा अनोखा रेकॉर्ड केला होता. 11 दिवसांतील  528 तासांत एक सेकंदही तो झोपला नाही. डिसेंबर 1663 साली हा रेकॉर्ड करण्यात आला. जानेवारी 1964 पर्यंत हा रेकॉर्ड चालला. पण त्यानंतर रँडीची अवस्था इतकी भयंकर झाली की हा स्टंट जीवघेणा असल्याचं म्हणजे 1964 साली गिनीज वर्ल्डने असे स्टंट करण्यावर बंदी आणली. रँडीला थकवा वाटू लागला. खाण्याची चव कमी लागू लागली. 14 तास त्याने झोप घेतली त्यानंतर तो ठिक झाला, असं आज तकच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - 2 मिनिटात लागेल गाढ झोप; वापरा हे 4-7-8 मिलिट्री टेक्निक एखादी व्यक्ती जर सलग अकरा दिवस झोपली नाही तर त्याचा मृत्यूही (Lack Of Sleep Cause Death) होऊ शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती झोपेशिवाय केवळ 11 दिवस जगू शकते. हार्वर्डने केलेल्या अभ्यासानुसार, “झोपेची कमतरता थेट आतडे आणि मेंदूवर परिणाम करू शकते आणि यामुळे शरीराचे नुकसान होऊन मृत्यू होऊ शकतो." आणखी एका अभ्यासानुसार रात्रीच्या वेळी 6 तासांपेक्षा कमी वेळ झोप घेत असाल, तर तुमचं आयुर्मान (Life Span) 12 टक्क्यांनी कमी होतं. याचाच अर्थ तुम्हाला अपमृत्यूचा धोका असतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दररोज 6 ते 8 तास शांत झोप घेण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेण्याचे इतर दुष्परिणाम इन्युनिटी कमकुवत होते आवश्यकतेएवढी झोप न घेतल्यास शरीराची इम्युन सिस्टीम (Immune System) कमकुवत होऊ लागते. यामुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता वाढते. कोरोना काळात खोकला होणं ही धोक्याची घंटा असू शकते. तसंच इम्युन सिस्टीम लशी (Vaccine) आणि औषधांनुसार कार्य करू शकत नाही. त्यामुळे कोणताही आजार बरा होण्यास बराच वेळ लागतो. रक्तदाब वाढतो एखादी व्यक्ती शांत आणि पुरेशा झोपेचा आनंद घेऊ शकत नसेल, तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन (Hypertension) होण्याची शक्यता असते. काही काळ ही स्थिती कायम राहिल्यास अशा व्यक्तीला हार्ट अॅटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) येण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. हे वाचा - Kidney Disease: किडनी खराब होऊ द्यायची नसेल तर हे पदार्थ खाणं सोडा; अडचणी वाढतील पचनशक्तीवर परिणाम कमी प्रमाणात झोप घेतल्यानं पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शरीरातलं पित्ताशय आणि स्वादुपिंडाच्या (Pancreas) कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी वजन वाढू लागतं. शरीर इन्शुलिनला (Insulin) प्रतिकार करू लागतं. असं होऊ लागलं तर टाइप-2 डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. डायबेटीस (Diabetes) आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी झाले तर धोका अधिक वाढतो. मेंदूवर परिणाम योग्य झोप न मिळाल्यानं मेंदू सतर्क (Alertness) राहू शकत नाही. कमी झोपेमुळे मेंदूची सतर्कता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात चुका वाढू लागतात, अपघाताची शक्यता वाढते. कमी झोप घेतल्यामुळे निर्णयक्षमतेवरही परिणाम होतो. तणाव आणि अस्वस्थता वाढते. ही स्थिती गंभीर झाल्यास संबंधित व्यक्तीला डिमेन्शिया किंवा अल्झायमरसारखे विकार जडू शकतात. त्यामुळे दररोज पुरेशी आणि शांत झोप घेऊन आजारांना दूर ठेवणं हे श्रेयस्कर ठरू शकतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या