• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • ऑनलाइन ऑर्डर केलेला iPhone तर मिळाला पण चक्क ग्राहकाच्या उंचीचा; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

ऑनलाइन ऑर्डर केलेला iPhone तर मिळाला पण चक्क ग्राहकाच्या उंचीचा; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

तरुणाला iPhone तर मिळाला पण त्याचा आकार पाहून त्याला धक्काच बसला.

  • Share this:
बॅंकॉंक, 27 मार्च : सेल किंवा कमी किंमत पाहून आपण आपल्याला हवी ती वस्तू ऑनलाईन (Online) मागवत असतो. ऑनलाईनवर नोंदणी करताना आपण पुरेशी काळजी घेत वस्तू बुक करतो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा वस्तू घरी येते, तेव्हा ती निराळीच असते. काही ग्राहकांची यात फसवणूक झाल्याच्याही घटना ऐकायला मिळतात. थायलंडमध्ये नुकताच असा एक प्रकार उघडकीस आला आहे. थायलंडमधील (Thailand) एका किशोरवयीन मुलाला ऑनलाईनवर कमी किमतीत आयफोन (iPhone) उपलब्ध आहे, असं दिसल्याने त्याला खूप आनंद झाला. परंतु त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. जेव्हा प्रत्यक्ष पार्सल त्याच्या हातात पडलं तेव्हा त्याच्या आनंदाचं रुपांतर दुःखात झालं. कारण त्या पार्सलमध्ये आयफोनऐवजी आयफोन आकाराचा कॉफी टेबल (Coffee Table)होता.  ओरिएंट डेली मलेशियाच्या वृत्तानुसार, ज्या पार्सलमधून आयफोन येणं अपेक्षित होतं ते पार्सल मात्र प्रत्यक्षात त्याच्या उंची एवढं होतं. त्यानं उत्सुकतेनं पार्सल उघडलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला आणि दुःखीपण. कारण त्या पार्सलमध्ये आयफोन आकाराचा कॉफी टेबल होता. टेबल पाहताच कमी दरात आपला आवडता आयफोन मिळेल अशी त्याची अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली. दुर्देवाने ऑर्डर देण्यापूर्वी त्याने त्या उत्पादनाचे डिटेल्स काळजीपूर्वक न पाहिल्याने असं घडलं. हे वाचा - Man Vs Dog : अनोख्या Volleyball मॅचमध्ये खरा खिलाडी कोण? VIDEO पाहून सांगा अॅपल फोन आणि अॅपल फोनच्या आकाराचा टेबल याबाबत गोंधळ होणं ही ग्राहकाची चूक होती. जेव्हा या मुलानं आयफोन स्वस्तात मिळत असल्याचं ऑनलाईन पाहिलं तेव्हा तो खूप उत्साहित झाला आणि त्यानं फारशी माहिती न घेता या डिलमध्ये (Deal) फायदाच होईल असा विचार करत ऑर्डर दिली. पण जेव्हा ऑर्डरचे पार्सल त्याच्या हातात पडलं तेव्हा आपण मोठी चूक केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर या मुलाने सोशल मीडियावर याबाबतचे फोटो पोस्ट करत आपण कसे मूर्ख बनलो, हे शेअर केले. तो म्हणाला की, फोन स्वस्त आहे पण शिपिंगचा खर्च नेहमीपेक्षा जास्त आहे ही गोष्ट मला जरा विचित्र वाटली. पण हे डिल चांगलं आहे, असं मला वाटलं. हे वाचा - दिवसरात्र हातात पुस्तक घेतलेला मुलगा नक्की काय वाचतो आहे? मजेदार VIDEO व्हायरल बनावट किंवा आयफोन मिळाल्याची ही आणखी एक घटना समोर आली आहे. परंतु खरेदी करण्यापूर्वी त्यापैकी कोणत्याच वस्तूचा तपशील चुकला नसल्याचं नोंदवण्यात आलं होतं. या महिन्याच्या सुरुवातीलाआसाममधील गुवाहाटी येथील एका व्यक्तीला फ्लिपकार्टकडूनअसाच बनावट आयफोन (Fake iPhone) मिळाला होता. विशेष म्हणजे आयफोनसाठी त्या व्यक्तीनं 1,24,900 रुपये पेड केले होते. अत्यंत कमी क्षमतेनं फोन चार्ज होत असल्याचं लक्षात आल्यावर ही व्यक्ती तो फोन घेऊन नजीकच्या दुकानात गेली असता तो फोन बनावट असल्याचं त्याला समजलं होतं.
First published: