पालकांनो लक्ष द्या! बाटलीतून दूध नाही तर बाळाच्या शरीरात जातोय घातक घटक

पालकांनो लक्ष द्या! बाटलीतून दूध नाही तर बाळाच्या शरीरात जातोय घातक घटक

शक्यतो मुलांना बाटलीतून दूध (plastic bottle milk) देऊच नये असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्लॅस्टिक बाटलीतून दूध पाजल्याने त्याचे नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास संशोधकांनी केली.

  • Share this:

डबलिन, 22 ऑक्टोबर : अनेक पालक आपल्या बाळांना (baby) बाटलीतून दूध (milk bottle) देतात. मुलांच्या दुधाच्या बाटलीसाठी वेगळ्या प्रकारचं प्लॅस्टिक (plastic) वापरलं जातं. जेणेकरून त्यांना हानी पोहोचणार नाही. मात्र तरीदेखील अशा प्लॅस्टिक बाटलीतून दूध देणं किती घातक ठरू शकतं, हे नव्यानं झालेल्या संशोधना दिसून आलं आहे.

आयर्लंडमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात प्लॅस्टिक बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळांच्या शरीरात दररोज लाखो मायक्रोप्लॅस्टिक (microplastics) जात आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

संशोधकांनी फूड कंटेनरसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं प्लॅस्टिक पॉलिप्रोपिलीनपासून बनवलेल्या दहा प्रकारच्या बाळांच्या बाटल्या किंवा इतर वस्तूंतील मायक्रो प्लॅस्टिकचं प्रमाण तपासलं. या प्लॅस्टिक वस्तू उत्पादकांनी जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं होतं. 21 दिवसांच्या चाचणीचा कालावधीनंतर बाटल्यांमध्ये प्रतिलीटर 1.3 ते 16.2 दशलक्ष प्लास्टिक मायक्रो पार्टिकल्स आढळून आले.

त्यानंतर संशोधकांनी विविध देशांतील स्तनपानाची राष्ट्रीय सरासरी लक्षात घेऊन त्याआधारे जगभरातील बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांच्या पोटात किती प्रमाणात मायक्रोप्लॅस्टिकचे कण जात असावेत याचा डाटा तयार केला. त्यांच्या अंदाजानुसार पहिल्या 12 महिन्यांत बाळ बाटलीने दूध पिताना दररोज 1.6 दशलक्ष प्लॅस्टिक मायक्रो पार्टिकलचे सेवन करत असावं असा अंदाज त्यांनी बांधला.‌

हे वाचा - कोरोना योद्धांसाठी गाढव झालं डॉक्टर; Donkey therapy ने राखलं जातंय मानसिक आरोग्य

बाळांच्या पोटात किती मायक्रोप्लॅस्टिक जातं आहे हे सांगून पालकांना घाबरणं हा या संशोधनाचा उद्देश नाही. हे पोटात जाणारं मायक्रोप्लॅस्टिक बाळांच्या आरोग्याला किती घातक आहे याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांनी अजिबात काळजी करू नये. असंही ट्रिनिटी कॉलेज डबलिनमधील संशोधकांच्या या टीमने स्पष्ट केलं आहे.

नेचर फॉर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या अभ्यासकांनी सांगितलं की, दुधाच्या बाटल्या जास्त गरम पाण्यात धुतल्या तर त्यातून मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लॅस्टिक निघतं. हे प्रमाण 25 अंश सेल्सियस तापमानाला प्रतिलीटरमध्ये सरासरी 0.6 दशलक्ष कणांवरून ते 95 अंश सेल्सियस तापमानाला प्रतिलीटर सरासरी  55 दशलक्ष कणांपर्यंत आहे.

हे वाचा - प्रेग्नन्सीनंतर आहारात 8 पदार्थांचा आवर्जून समावेश; आईसह बाळही रहिल हेल्दी

दूध भरण्याआधी बाटलीत थंड स्टरिलाइज्ड पाण्याचा वापर करावा. शिवाय फॉर्म्युला मिल्क प्लॅस्टिक बाटलीत भरण्याआधी प्लॅस्टिक व्यतिरिक्त इतर भांड्यात तयार करावं. जेणेकरून बाळाच्या शरीरात जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिकची पातळी सहजपणे कमी करता येईल, असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या