S M L

दुधी भोपळ्याचा रस सेवन करताय ?, आधी हे वाचा...

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2018 10:32 PM IST

दुधी भोपळ्याचा रस सेवन करताय ?, आधी हे वाचा...

आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून आपण अनेक फळांच्या अथवा फळभाज्यांच्या रसाचे सेवन करतो. मात्र दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करणं जीवावरही बेतू शकतं.

भोपळ्याचे फायदे

- हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमध‍ील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.- दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात.

- रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधीभोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो.

दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू

Loading...

- दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमुटभर जायफळ पूड ‍मिसळून तयार झालेला तेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.

- एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यात घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होते.

- दुधी भोपळ्याचा एक वाटी रस एक चमचा ओवा, चिमुळभर काळेमीठ घालून गरम करून ते चाखल्याने पोटाचा फुगीरपणा कमी होतो.

- दुधीभोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरा आणि पिंगळी वाटून त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो.

दुधी भोपळ्याचा रस तुरट लागत असेल तर तो पिणे जिवावर बेतू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 10:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close