Boss Day: या 5 उपायांनी लगेच जाईल बॉसचा राग, एकदा वाचून पाहाच!

घरात ज्या प्रमाणे बायको आनंदी असली की घर आनंदी राहतं अगदी त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये बॉस जर खूश असेल तर संपूर्ण ऑफिस शांत राहतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 12:12 PM IST

Boss Day: या 5 उपायांनी लगेच जाईल बॉसचा राग, एकदा वाचून पाहाच!

आज 16 ऑक्टोबरला बॉस डे आहे. घरात ज्या प्रमाणे बायको आनंदी असली की घर आनंदी राहतं अगदी त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये बॉस जर खूश असेल तर संपूर्ण ऑफिस शांत राहतं. पण अनेकदा छोट्या- मोठ्या चुकांमुळे किंवा गैरसमजांमुळे बॉसचा राग तुम्हाला सहन करावा लागतो. आता बॉस तुमच्यावर रागावला तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होणारच ना... पण आता बॉस तुमच्यावर रागावला असेल तर त्यावर फार चिंता करण्याची गरज नाही. आम्ही अशा काही टीप्स देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही बॉसचा राग तुम्ही लगेच शांत करू शकता.

बॉसचे काळजीपूर्वक ऐका-

बर्‍याच वेळा बॉस तुमच्यावर रागवतात तेव्हा तुम्हालाही त्यांचा राग येतो. पण त्यांचा मताचा आणि अनुभवाचा आदर करत त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. तेव्हा  त्यामुळे बॉसचे शब्द काळजीपूर्वक ऐका आणि शांत रहा. फक्त योग्य वेळी योग्य गोष्ट बोला. शब्दाला शब्द लावला तर भांडणं मोठं होऊ शकतो. असं केल्याने बॉसचा राग शांत न होता अजून  वाढेल.

विनम्रपणे माफी मागा-

रागावलेल्या बॉसला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माफी मागा. बर्‍याच वेळा माफी मागितल्याने गोष्टी सुधारल्या जातात. तुमच्या विनम्र वागणूकीने बॉसचा राग लगेच शांत होऊ शकतो.

Loading...

पुष्पगुच्छ भेट म्हणून द्या-

फूल ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही भेट म्हणून देऊ शकता. फूलं कोणाला आवडत नाहीत. रागावलेल्या बॉसला पुष्पगुच्छ भेट दिली तर त्यांनाही ते नक्कीच आवडेल आणि यामुळे त्यांचा राग दूर होईल. पुष्पगुच्छासोबत एक सॉरीचं कार्डही तुम्ही बॉसला देऊ शकता. यामुळे त्यांना बरं वाटेल.

वाद न घालता शांत रहा-

बऱ्याचवेळा आपण बरोबर आहोत हे आपल्याला माहीत असतं या एका मुद्द्यावर आपण बॉसशी भांडायला जातो. पण असं केल्याने गोष्टी अजून बिघडू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद टाळत शांत राहण्याचा प्रयत्न करावा. रागावलेल्या बॉसला लगेच आपलं मत न सांगता काही काळ त्यांना एकट राहू द्यावं. ते थोडे शांत झाले की शांतपणे आपला मुद्दा मांडावा.

श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्माचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

सोशल मीडियावर चर्चा फक्त या 50 वर्षांच्या आईचीच, पाहा का होतायेत तिचे PHOTO VIRAL

Facebook फाउंडर Mark Zuckerbergकडे आहे असं काही की तुम्ही हसू रोखू शकणार नाही!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 16, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...