त्यांनी हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्याखाली संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलंय की, कशी लोक असतात त्यांना दुसर्याच्या सुख-दुःखा विषयी काहीच घेणंदेणं नसतं. अतिशय निर्दयी ही लोक आहेत. आणखी एकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना असं म्हटलं की या असल्या लोकांचे कारणामे सर्वांसमोर यायला पाहिजेत जेणेकरून यांच्या कंपन्यांमध्ये कोणी गुंतवणूकच करणार नाही. तर एकाने अशा लोकांकडे माणुसकी नावाच काही असतच नाही असे म्हटले आहे. हे वाचा - किम जोंग उन यांच्यापेक्षाही भयंकर त्यांची बहिण, गोळ्या घालून वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्याचे आदेश या पोस्टवर काही लोकांनी आपल्याला आलेले वाईट अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली.एका महिलेने सांगितले की माझ्या वडिलांचा झाला होता त्यानंतर थोड्याच वेळात मला इन्वेस्टर चा फोन आला आणि त्यांनी लगेच एक मीटिंग घेण्यास सांगितलं.त्यावेळी माझी काय अवस्था होते मात्र मीटिंग घेण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अजून एका महिलेने देखील गरोदर असतानाची तिची गोष्ट सांगितली तिलाही अशाप्रकारे प्रसुती कळा सुरू असतानाही मीटिंग संपण्याची वाट बघायला लागली आणि त्यानंतरच दवाखान्यात जाता आले.Friend's water broke during a board meeting.
She says, "I need to go to the hospital my water just broke!" Lead investor from well known fund says, "Ok, but can we finish the meeting first?" She finished the board meeting in the car while en route to the hospital. WTF. — Christine Carrillo (@ChristineCarril) May 21, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Pregnant woman