• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची बिनधास्त पोस्ट; काय लिहिलंय वाचा..

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची बिनधास्त पोस्ट; काय लिहिलंय वाचा..

सोशल मीडियापासून (Social Media) शिल्पा शेट्टीची नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने प्रत्येक क्षण जगण्याचा संदेश दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑगस्ट :  बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी (Bollywood Actress Shilpa Shetty) सोशल मीडियावर पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह (Active) झाली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर (Social Media) नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट लगेचच व्हायरल (Viral) झाली आहे. शिल्पा शेट्टी याआधीही इंस्टाग्रामवरती पोस्ट (Instagram Post) आणि व्हीडिओ शेयर करायला सुरुवात केली होती. या पोस्टमधून तिने एक मेसेज शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून शिल्पाने याही परिस्थितीत प्रत्येक क्षण सगळ्यात जास्त जगणार असल्याचं सांगितलं आहे. बरेचजण सोशल मीडिया युजर्स तिच्या पोस्टचा वेगळा अंदाज बांधत आहेत. शिल्पा शेट्टीने ही पोस्ट शेअर करत लिहिलंय की, प्रत्येक क्षण जगायला हवा. तिने ‘टाईम आउट’ बद्दल सांगणारं एका पुस्तकाचा एक भाग शेअर केला आहे. ज्यानुसार कोणताही क्षण वाया न  घालवता. आपलं आयुष्य जगावं कारण आयुष्यात पॉज बटण नसतं. बऱ्याचवेळा वेळ चांगली किंवा वाईट असलीतरी आयुष्यातला तणावपूर्ण क्षण आले असती तर, ते आपल्या आयुष्यातून काढू शकतो का? परिस्थिती कशीही असो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण झरझर निघून जात असतो. आपल्याकडे फक्त वेळ असतो आणि प्रत्येक क्षण आपण चांगल्या पद्धतीने जगाला हवा. शिल्पा शेट्टी शेवटी असं लिहिते की, मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण पूर्णपणे जगायचा आहे. याआधी शिल्पा शेट्टीने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विश्वासाबद्दल संदेश लिहिलेला होता. (इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई) राज कुंद्रा (Raj Kundar) प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून तिला ट्रोलिंगला (Trolling) सामोरं जावं लागलेलं आहे. याशिवाय राज कुंद्राला अटक झाल्यानंतर तिला आपल्या कुटुंबालाही आधार द्यावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शिल्पा शेट्टी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आहे. (अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे रोज खा हिरवे दाणे) शिल्पा शेट्टीने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. शिल्पा शेट्टी ‘सुपर डांसर 4’ या रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहते आहे. पण, राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर ती या शोमधून देखील गायब होती. नुकताच या शोमध्ये पुनरागमन केलेला आहे. राजला अटक झाल्यानंतर ती या शोच्या प्रमोशमध्येही सहभागी झाली नाही. आता ती सोशल मीडियावर देखील अ‍ॅक्टिव्ह झाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: