मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना केली मोठी चूक; Tweet delete केल्यानंतरही झाली मजबूत ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना केली मोठी चूक; Tweet delete केल्यानंतरही झाली मजबूत ट्रोल

अनेकदा विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक चुका करतात. शिल्पाने तिचं जुनं Tweet डिलीट केल्यानंतरही तिला जबरदस्त ट्रोल केलं गेलं. लोकांनी memes सुद्धा बनवले. काय लिहिलं होतं असं शिल्पाने?

मुंबई, 26 जानेवारी : अभिनेत्री (actress) शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) सोशल मीडियावर (social media) बरीच सक्रिय असते. सतत ती तिचे आणि तिच्या उपक्रमांचे फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day) मात्र शिल्पा तिच्या एका ट्वीटवरून ट्रोल झाली आहे.

शिल्पा शेट्टीनं ट्वीट (twitter) करत आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या (republic day) शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना तिनं एक चूक (Shilpa Shetty tweet) केली. यात तिनं प्रजासत्ताक दिनाला 'स्वतंत्रता दिवस' म्हटलं. यानंतर काही जणांनी तिची चूक लक्षात आणून दिली. शिल्पाने तातडीने तिचं ते ट्वीट डिलीट केलं. नव्याने Tweet करत शुभेच्छा दिल्या. पण तेवढ्या वेळात शिल्पाच्या जुन्या ट्वीटचे स्क्रीनशॉट जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, '72व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अनेकानेक शुभेच्छा. प्रत्येक भारतीयाला हॅपी रिपब्लिक डे. आपण सगळे त्या अधिकार आणि कर्तव्यांना कायम राखण्याची प्रतिज्ञा करू या जे आपल्या संविधानानं आपल्याला दिले आहेत. फक्त आपल्या स्वतःसाठी नाही तर सर्व नागरिकांसाठी जय हिंद.' मात्र यावर तिला ट्रोल (troll) केलं गेलं तेव्हा तिनं जुनी पोस्ट डिलीट करत नवं ट्वीट केलं.

तिच्या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत युजर्सनी विविध कमेंट्स केल्या.  मीम्सही सुरू झाली. एका युजरनं लिहिलं, 'ऐसे कैसे चलेगा दीदी'

दुसऱ्या एका युजरनं यावर सगळ्या बॉलिवुडलाच वेठीस धरलं.

अनेकांनी यावर मीम्सही बनवले

शिल्पा शेट्टीने केलेली ही चूक तिला बरीच महागात पडली. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला गोंधळ उघडा पडल्याने ट्रोलची शिकार झाली.

First published:
top videos

    Tags: Republic Day, Twitter