• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कशाची चर्चा होणार याचा नेम नाही! सारा अली खानच्या या बिकिनीच्या किमतीवरून सोशल मीडिया पेटला

कशाची चर्चा होणार याचा नेम नाही! सारा अली खानच्या या बिकिनीच्या किमतीवरून सोशल मीडिया पेटला

सारा अली खानने (Sara ali khan) अलीकडेच पोस्ट केलेला निळ्या बिकिनीचा (Bikini Photo) फोटो वेगळीच चर्चा घडवत आहे. कशावरून कशाची चर्चा रंगणार याचा काही नेम नाही हल्ली

 • Share this:
  मुंबई, 27 जानेवारी: सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सारा अली खान (Sara Ali khan) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते. अलीकडेच साराने मालदीवचे काही फोटो (Maldives Photo) शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत, असून लाखो चाहत्यांनी या फोटोंना पसंती दर्शवली आहे. तिने अलीकडेच एक निळ्या रंगाच्या मोनोकनी ड्रेसवरचा (Bikini Photo) फोटो शेअर केला आहे. सारा या फोटोंत अतिशय सुंदर दिसत आहे. पण साराने परिधान केलेल्या मोनोकनीची किंमत इतर तारकांच्या पोशाखाप्रमाणे महाग नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल पण त्याची किंमत केवळ साडेचार हजार रुपये आहे. त्यामुळे एक सामान्य चाहता म्हणून तुम्हीही साराने परिधान केलेली मोनोकनी खरेदी करू शकता. अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह मालदीवला सुट्टीसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम देखील होता. या सहलीचे अनेक फोटो साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहेत. पण सोशल मीडियावर आता तिच्या फिक्कट निळ्या रंगाच्या मोनोकनीची बरीच चर्चा होत आहे. चर्चेचं कारण म्हणजे या मोनोकनीची किंमत. तिच्या मोनोकनीची किंमत 4,200 ते 4,500 रुपयांच्या दरम्याम असल्याचं बोललं जात आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने तिच्या मोनोकनीची किंमत शोधून काढल्यानंतर ती पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. साराच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच तिचा 'कुली नंबर 1' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि वरुण धवनने मुख्य भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त सारा लवकरच 'अतरंगी रे' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुष यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: