वयाच्या 45 व्या वर्षीही HOT दिसते मलायका अरोरा, हा आहे तिचा फिटनेस फंडा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका नवोदित कलाकारांना टक्कर देईल एवढी मादक दिसते.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 12:58 PM IST

वयाच्या 45 व्या वर्षीही HOT दिसते मलायका अरोरा, हा आहे तिचा फिटनेस फंडा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका नवोदित कलाकारांना टक्कर देईल एवढी मादक दिसते. आज आपण तिच्या सौंदर्यावर नाही तर तिच्या फिटनेसबद्दल बोलणार आहोत. मलायकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर प्लँक करतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती साइड प्लँक करताना दिसते. या फोटोत ती सर्वात कठीण अशी साइड प्लँक एक्सरसाइज अगदी सहजतेने करताना दिसत आहे. सध्या मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या फिटनेसचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तिच्या या फिटनेसचं रहस्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊ...

प्लँक ही एक बॉडी वेट एक्सरसाइज आहे. फिट राहण्यासाठी प्लँक एक्सरसाइज फार फायदेशीर आहे. यामुळे पोटाचे मसल्स मजबूत होतात आणि या व्यायामामुळे पाठीच्या कण्यावर आणि पार्श्वभागावर (Hips) ताण येत नाही. यामुळेच प्लँक करताना कोणतीही दुखापत होण्याचा धोका कमी असतो. नियमितपणे प्लँक केल्याने मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात आणि घाम येतो. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते. याचमुळे दररोज किमान 10 मिनिटं प्लँक करणं आवश्यत आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

Here’s another Monday and here is a glimpse of a fantastic workout session at @thedivayoga. “I love planks” said no one ever! The side plank is one of the most gruelling 30 seconds of the plank family. I love how my Diva squad pushes me every day to do better so, here’s my Vashishthasana. A) It strengthens your wrists, forearms, shoulders, and spine B) Increases flexibility in the wrists. C) Opens the hips and hamstrings. D) Tones the abdominal muscles. E) Improves balance, concentration, and focus. On days when I feel exceptionally powerful, I love to channelize it through my body and just let it emanate into the universe! Hello Universe, Hello new week! #malaikasmondaymotivation @reebokindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

शरीराचं संतुलन कायम रहावं अशी इच्छा जर तुमची असेल तर प्लँक एक्सरसाइज तुमची चांगली मदत करू शकतं. कोणतीही व्यक्ती एका मिनिटापेक्षा जास्त एका पायावर उभी राहू शकत नाही. पण प्लँक केल्याने मांसपेशी मजबूत होतात. ही एक्सरसाइज केल्याने मोठ्या कालावधीसाठी शरीर संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे कोणतीही व्यक्ती डोक्यावर आणि एका पायावर खूप वेळ सहज उभी राहू शकते. यामुळे खांदा, पाय, कंबर हे भाग मजबूत होतात. तसंच शरीर अधिक लवचिक होतं.

स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे मोठ्याप्रमाणात अंगदुखी होते. सतत बसल्यामुळेही स्नायूंवर ताण येतो. स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी प्लँक करा. प्लँक केल्याने मेंदूही शांत होतो आणि चिंता आणि नैराश्याचा धोकाही कमी होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Vastushastra: घराच्या मुख्य दरवाजाकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर व्हाल कंगाल!

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

विमानातून प्रवास करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...