मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Egg Boiling Tips : अंडे उकडलेले आहे की कच्चे? या ट्रिकने लगेच समजेल

Egg Boiling Tips : अंडे उकडलेले आहे की कच्चे? या ट्रिकने लगेच समजेल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अंड्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते, अनेकांना ऑम्लेट आवडते, तर काहींना भुर्जी बनवून खाणे आवडते, तसेच लोक अंडा करी, ब्रेड टोस्ट किंवा हाफ फ्रायच्या रूपात देखील अंड खातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 19 जानेवारी : अनेक लोक आपल्या ब्रेकफास्ट आणि डाइटमध्ये अंड्याचा समावेश करतात. उकडलेली अंडी आरोग्याची चांगलं असल्याचं देखील अनेक डॉक्टर सांगतात. वास्तविक, अंड्याला प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानला जातो, जो आपले स्नायू आणि शरीर मजबूत करण्यास मदत करतो. याशिवाय उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक देखील आढळतात, जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक असतात.

तसे पाहाता अंड हा असा प्रकार आहे, जो अनेक प्रकारे खाऊ शकतात

अंड्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते, अनेकांना ऑम्लेट आवडते, तर काहींना भुर्जी बनवून खाणे आवडते, तसेच लोक अंडा करी, ब्रेड टोस्ट किंवा हाफ फ्रायच्या रूपात देखील अंड खातात. परंतु बहुतेक आरोग्य तज्ञांच्या मते अंड खाण्याचा सर्वात पौष्टिक मार्ग म्हणजे ते पाण्यात उकळणे आणि खाणे. कारण उकडलेल्या अंड्यामध्ये कोणतेही तेल किंवा चरबी नसते.

पण अंडी उकडणे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. आम्ही असे म्हणत आहोत, कारण तसे पाहाता अंड उकडण्यासाठी फक्त गॅस शेगडी, तवा आणि थोडे पाणी आवश्यक आहे, परंतु यामुळे अंडी योग्य प्रकारे उकळली की नाही हे कळत नाही. बऱ्याचदा जेव्हा आपण अंड्याचे कवच काढतो तेव्हा कळते की ते अर्धेच कच्चे आहे.

मग या सगळ्यात अंड पूर्ण उकडलंय की अर्ध कच्चं आहे हे कसं ओळखायचं? चला जाणून घेऊ.

पहिला मार्ग

अंडी एका सपाट पृष्ठभागावर फिरवा आणि आपल्या तर्जनीने अचानक थांबवण्याचा प्रयत्न करा. जर ते लगेच थांबले तर ते उकडलेले आहे. जर ते डगमगले तर ते कच्चे आहे.

दुसरा मार्ग

जर अंड पूर्णपणे उकडले असेल तर गरम पॅनमध्ये त्याच्या पृष्ठभागावरून पांढरे रंगाचे बुडबुडे बाहेर येऊ लागतात. साधारणपणे, अंडी 10 ते 15 मिनिटांत खाण्यायोग्य बनते. त्यानंतर तुम्ही ते पॅनमधून काढू शकता.

तिसरा मार्ग

भांड्यातून अंडी काढा आणि कानाजवळ थोडं हलवण्याचा प्रयत्न करा. जर त्यातून काही आवाज येत असेल तर समजून घ्या की अंडे थोडे जास्त उकळावे लागेल. जर काहीही आवाज ऐकू आला नाही आणि अंड्यामधील अवरण हल्ले नाही तर समजा की ते शिजलेले आहे.

First published:

Tags: Food, Lifestyle, Social media, Top trending, Women