मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Viral Video : बॉडीबिल्डरने केलेले स्टंट पाहून व्हाल थक्क! व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस

Viral Video : बॉडीबिल्डरने केलेले स्टंट पाहून व्हाल थक्क! व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस

व्यायाम करणं आणि बॉडी बनवणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रत्येकाने स्वतःचं शरीर बळकट ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. परंतु शरीर मजबूत करणं प्रत्येकाला शक्य नसतं. त्यासाठी वर्षानुवर्षं मेहनत घ्यावी लागते. व्यायाम करून बॉडी बनवलेल्या व्यक्तींचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.

पुढे वाचा ...

  मुंबई, 29 नोव्हेंबर : चांगल्या आणि परफेक्ट बॉडीसाठी ( perfect body) हल्ली जिमला (Gym) जाण्याचं प्रमाण चांगलंच वाढत चाललं आहे. शरीर फिट ठेवण्यासाठी योग्य आहाराला ( proper diet) व्यायामाचीही ( exercise) जोड देणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा एखाद्या बॉडीबिल्डर ( bodybuilder) व्यक्तीकडून व्यायाम, आहाराबाबत सल्ले घेतले जातात. एखादी बॉडीबिल्डर व्यक्ती दिसली, त्या व्यक्तीचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहण्यात आला, तरी त्याच्यासारखंच स्वतःचं शरीर बनावं, असंही वाटणं साहजिकच आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामधल्या बॉडीबिल्डरने अनेकांना भुरळ घातली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  व्यायाम करणं आणि बॉडी बनवणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रत्येकाने स्वतःचं शरीर बळकट ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. परंतु शरीर मजबूत करणं प्रत्येकाला शक्य नसतं. त्यासाठी वर्षानुवर्षं मेहनत घ्यावी लागते. व्यायाम करून बॉडी बनवलेल्या व्यक्तींचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. ते पाहून प्रत्येकाच्या मनात अशी इच्छा जागृत होते, की आपणही असंच शरीर कमवावं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात एक बॉडीबिल्डर त्याच्या दंडामध्ये, हातांमध्ये किती ताकद आहे, हे दाखवत आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच या बॉडीबिल्डरने मेहनतीच्या बळावर कमावलेल्या शरीरयष्टीचं कौतुक करावंसं वाटेल.

  शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट

  या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती विविध पद्धतीने पुशअप करताना दिसत आहे. हाताच्या सहाय्याने काचेच्या बाटलीवर उभे राहूनही तो अप्रतिम स्टंट दाखवतो. हा व्हिडिओ एकूण 3 मिनिटं 7 सेकंदांचा आहे. या व्हिडीओला 22 मिलियन म्हणजे दोन कोटी 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 20 हजारांहून अधिक जणांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यावरून लोकांना हा व्हिडीओ किती आवडला आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

  व्हिडीओ पाहा-

  हा व्हिडिओ हाउस ऑफ बाउन्स (House of Bounce) नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की तो माणूस त्याच्या हातांमध्ये असणारी ताकद कशी दाखवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, तो माणूस आधी जमिनीवर पुशअप मारतो आणि लगेचच लाकडाच्या दोन मोठ्या तुकड्यांवर उडी मारतो आणि त्यावर फक्त हाताच्या बळावर बराच वेळ थांबतो.

  Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

  यानंतर, तो लांबून धावत येतो आणि उडी मारत पुशअप करू लागतो, असंही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर दोन लोखंडी रॉडच्या साह्याने तो हाताच्या बळावर उठतो आणि हवेत चालत असल्याप्रमाणे पाय वर करतो. त्याचा हा स्टंट आणि संतुलन अप्रतिम आहे. या व्हिडिओमधल्या तरुणाची शरीरयष्टी पाहून कोणालाही वाटेल, की स्वतःचं शरीरदेखील असंच असावं. परंतु चांगली शरीरयष्टी तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, हे विसरता कामा नये.

  First published:
  top videos

   Tags: Fitness, Health Tips