तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत

तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत

आयोडीनची कमतरता निर्माण झाली की शरीर संकेत देऊ लागतं त्यांना ओळखून लगेच योग्य उपाय करणं आवश्यक आहे.

  • Last Updated: Dec 11, 2020 11:28 PM IST
  • Share this:

दीर्घकाळ आयोडीनची (iodine) कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. एका वयस्कर व्यक्तीला रोज जवळपास 150 मायक्रोग्रॅम आयोडीनची गरज असते आणि त्याने ते सेवन करायला हवं. गर्भावस्थेच्या काळात महिलांना 220-290 मायक्रोग्रॅम आयोडीनची गरज असते. आयोडीन थायरॉइडच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ते त्याच्या ग्रंथींच्या विकासाला प्रभावित करतं. त्यामुळे हाइपोथायराइडिझमचा धोका असतो. आयोडीनयुक्त मीठ हा त्याचा उत्तम स्रोत आहे. आयोडीनची कमतरता निर्माण झाली की शरीर संकेत देऊ लागतं त्यांना ओळखून लगेच योग्य उपाय करणं आवश्यक आहे.

थकवा आणि नैराश्य : आयोडीन एक सूक्ष्म पोषक द्रव्य आहे जे शरीराच्या प्रत्येक ऊतीमध्ये असते. आयोडीनचा थेट संबंध थायरॉईड ग्रंथींशी असतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्रंथी योग्य प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनवू शकत नाहीत परिणामी हाइपोथायरायडिझम होतो. नैराश्य, थकवा, वजन वाढणं, बद्धकोष्ठता इत्यादी हाइपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत. myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं की, हाइपोथायराइडिझम व्यक्तीतील कॅलरी कमी करण्याच्या प्रक्रियेची गती मंदावते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. ऊर्जा कमी झाल्याने स्नायू व्यवस्थित काम करत नाही आणि त्याने अशक्तपणा जाणवायला लागतो.

केस गळणे, त्वचा कोरडी होणे : आयोडीनच्या कमतरतेने हाइपोथायरायडिझम होतो. त्याचा परिणाम त्वचा कोरडी होणे, केस गळणे, ही लक्षणे दिसू लागतात. थायराइड हार्मोन मुळे नवीन केस येतात, पण जर थायराइड हार्मोन तयार होणे कमी झाले तर मात्र ही प्रक्रिया बंद होऊन जाते. तसेच थायराइड हार्मोन पेशी निर्माणाच्या कामात देखील मदत करतात. पण हार्मोनच्या कमतरतेने पेशी नष्ट होऊ लागतात आणि अनेकदा त्वचा कोरडी होऊन त्यावर पापुद्रे येऊ लागतात.

ध्यान केंद्रित करण्यात आणि एकाग्रता राखण्यात कमी : आयोडीनची कमतरता मेंदुंच्या कार्याला प्रभावित करते. त्याने ध्यान केंद्रित करणे कठीण होते, मन एकाग्र होत नाही. जर ही दोन्ही लक्षणे एकत्र अन्य संकेतांसह दिसली तर आयोडीन च्या कमतरतेची चाचणी करायला हवी.

मानेवर सूज : आयोडीनच्या कमतरतेने मानेवर सूज येते. याचे कारण थायराइड ग्रंथींचा आकार वाढतो. जेव्हा ग्रंथींना योग्य प्रमाणात आयोदिन्न मिळत नाही तेव्ह्हा त्या खाद्य पदार्थांमधून जास्त प्रमाणात आयोडीन शोषण्याचा प्रयत्न करतात. याच कारणानी त्या ग्रंथींचा आकार वाढतो आणि मान सुजलेली दिसते.

थंडी वाजणे : आयोडीनच्या कमतरतेने चयापचय दर घसरू लागतो. त्याने शरीर उर्जा कमी निर्माण होते, परिणामी शरीर अशक्त होते आणि थंडी जास्त वाजते.

आयोडीन कमी झाले आहे असे वाटले तर काय करावे

आयोडीनची कमतरता असल्याची शंका आल्यावर थायराइडची तपासणी करा. रक्ताच्या तपासणीने आयोडीनच्या कमतरतेची माहिती मिळते. जर शरीरात नैसर्गिकरीत्या आयोडीन तयार होत नसेल तर त्याची पूर्ती करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे खाद्य पदार्थ होय. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांचे सांगणे आहे की आयोडीनचे उत्तम स्त्रोत म्हणजे धान्ये, डाळी, मासे, आणि इतर समुद्री पदार्थ. मांस आणि अंड्यामधे काही प्रमाणात आयोडीन असते. त्याशिवाय, बटाटे, दुध, , मनुका, दही, ब्राउन राइस, लसूण, मशरूम पालक, आणि आयोडीन युक्त मिठ हे पण आयोडीनचे उत्तम स्त्रोत आहेत. आयोडीनच्या कमतरतेकडे योग्य वेळी लक्ष देणे आणि या लक्षणांना ओळखून उपाय करणे हे नेहमीच आरोग्यासाठी चांगले ठरेल.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - थकवा: लक्षणे, कारणे, उपचार, औषध ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 11, 2020, 11:28 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या