Home /News /lifestyle /

ताप आल्यावर आपल्या शरीराचं तापमान का वाढतं? समजून घ्या कारण

ताप आल्यावर आपल्या शरीराचं तापमान का वाढतं? समजून घ्या कारण

viral-fever-poo

viral-fever-poo

ताप (Fever) आल्यावर आपल्या शरीराचं तापमान (Temperature) का वाढतं? जाणून घेऊया याचं कारण

    मुंबई, 03 ऑक्टोबर : ताप येणं, अंगात कणकण जाणवणं एक अतिशय सामान्य आजार आहे. ताप (Fever) आल्यावर आपल्या शरीराचं तापमान (Temperature) वाढतं. आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. शरीराचं तापमान जेव्हा ठराविक आकड्याच्या पुढे जातं, तेव्हा आपण ताप आला आहे असं म्हणतो. आपल्या शरीराचं तापमान सामान्यपणे 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98 डिग्री फारेनहाइट असणं आवश्यक असते. काही वेळा ते कमी अधिक होत असतं. दुपारी उन्हातून घरी आल्यावरही आपल्या शरीराचं तापमान हवामानामुळे वाढलेलं असतं. तापमान आपल्या शरीरातील हजारो रासायनिक क्रिया कार्यक्षमतेनं चालण्यासाठी आवश्यक असतं. शरीरातील उष्णता कमी होणं आणि शरीरातून उष्णता बाहेर पडणं या गोष्टींवर अवलंबून असतं. उष्णता जास्त झाली किंवा बाहेर टाकण्याची क्रिया संथावली की शरीराचं तापमान अधिकाधिक गरम होतं. हे वाचा-फेसबुकमुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो परिणाम; धक्कादायक माहिती उघड आपल्या शरीराचं तापमान मर्यादित ठेवण्यासाठी मेंदूतील हायपोथॅलॅमस (Hypothalamus) हा भाग दिवसरात्र काम करत असतो. हायपोथॅलॅमसला रक्तपुरवठा होत असतो. रक्ताचं तापमानही हायपोथॅलॅमसच्या पेशींवर काम करतं. ताप आलेला असताना आपल्या शरीरातील प्रतिकारक क्षमता (Immune Power) कमी झालेली असते. तापामध्ये अंग दुखणे, मरगळ येणे, डोळ्यांची आणि हातापायाची जळजळ होणे. अशी लक्षणं जाणवू लागतात. वर्षातून  1-2 वेळा ताप येणं चांगलं असतं. पण त्याकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. कारण सध्या कोरोनाच्या काळात कोणताही आजार अंगावर काढणं, आपल्या आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे कोणताही आजार अंगावर न काढता त्यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. हिंदी न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Health, Temperature

    पुढील बातम्या