मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बायसेप्सचा आकार वाढवण्यासाठी घेतलं इंजेक्शन; नंतर बॉडी बिल्डरची झाली अशी अवस्था की....

बायसेप्सचा आकार वाढवण्यासाठी घेतलं इंजेक्शन; नंतर बॉडी बिल्डरची झाली अशी अवस्था की....

बॉडी बिल्डर

बॉडी बिल्डर

तरुणाईला बॉडी बिल्डिंग, पिळदार शरीरयष्टीचं विशेष आकर्षण असतं. यासाठी अनेक तरुण जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंगसाठी विशेष परिश्रम घेताना दिसतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : तरुणाईला बॉडी बिल्डिंग, पिळदार शरीरयष्टीचं विशेष आकर्षण असतं. यासाठी अनेक तरुण जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंगसाठी विशेष परिश्रम घेताना दिसतात. जिम एक्सरसाइज व्यतिरिक्त आहार, सप्लिमेंट्सवरही भर देतात. जगभरात असे अनेक बॉडी बिल्डर आहेत, जे फिटनेस आणि अवाढव्य शरीरयष्टीसाठी ओळखले जातात. यापैकी काही बॉडी बिल्डर मोठे मसल्स किंवा बॉडी पार्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. काही लोक बॉडी पार्ट आकर्षक दिसावा यासाठी कठोर मेहनत करतात तर काही लोक शॉर्टकटचा वापर करतात. सध्या जगातील सर्वांत मोठे बायसेप्स असलेला एक बॉडी बिल्डर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या बॉडी बिल्डरची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून, त्याच्या हाताला 60 टाके पडले आहेत. या विषयीची माहिती त्याने फोटो शेअर करत दिली आहे. आपल्या बायसेप्सचा आकार वाढवा यासाठी त्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या. या गोष्टींचे शरीरावर दुष्परिणाम झाल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या बॉडी बिल्डरने बायसेप्ससाठी कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्या हे जाणून घेऊया. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

जगातील सर्वांत मोठे बायसेप्स असलेल्या सिजमोन कोमांडोस या बॉडी बिल्डरला नुकतंच शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. त्यानं हॉस्पिटलमधले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ त्याच्या बायसेप्सवरील शस्त्रक्रियेनंतरचा आहे. या व्हिडिओत सिजमोन बेडवर झोपलेला असून त्याच्या हाताला टाके घातले जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शस्त्रक्रियेनंतरचा पहिला व्हिडिओ आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती चांगली असल्याचं दिसत आहे. एका अहवालानुसार, सिजमोनच्या हाताला सुमारे 60 टाके पडले आहे. या बॉडी बिल्डरने बायसेप्सचा आकार वाढावा, यासाठी आपल्या हाताला सिंथॉल तेलाचं इंजेक्शन टोचलं होतं. या इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे त्याच्या हाताची अवस्था बिकट झाली आहे.

हेही वाचा -  गायी-म्हशीपेक्षा या प्राण्याचे दूध आहे जास्त फायदेशीर, अनेक आजार राहतात दूर

पोलंड येथील सिजमोन कोमांडोस हा प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि एमएमए फायटर आहे. ``बायसेप्सचा आकार वाढावा यासाठी मी एका धोकादायक तेलाचं इंजेक्शन बायसेप्सवर घेतलं. या इंजेक्शनमुळे माझ्या बायसेप्सचा आकार 25 इंचांनी वाढला,`` असं सिजमोननं एका मुलाखतीत सांगितलं. अल्पावधीतच सिजमोन कुस्तीच्या दुनियेतील एक प्रसिद्ध व्यक्ती बनला. शरीराच्या तुलनेत त्याच्या बायसेप्सचा आकार खूप मोठा होता. पण तेलाच्या दुष्परिणामांमुळे डॉक्टरांना त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली.

सिजमोनने बायसेप्सचा आकार वाढावा यासाठी आर्टिफिशियल तेल सिंथॉलची इंजेक्शनं घेतली. सिजमोन माइक टायस एक्सचा फेशियल टॅटू असलेला सिजमोन याने पत्रकार परिषदेत या आजाराविषयी माहिती दिली होती. तो म्हणाला, मी रोज 100 mg टेस्टोस्टेरॉन घेतो. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा मास्टरन 400mg आणि ऑक्सा 5mg हार्मोनही घेतो. याशिवाय मी बऱ्याच गोष्टी घेतो, ज्या मला आता आठवत नाहीत.

सिंथॉल हा एक पदार्थ आहे, जो बॉडी बिल्डर्सद्वारे तात्पुरता इम्प्लांट म्हणून वापरला जातो. हा पदार्थ स्नायूंमध्ये खोलवर इंजेक्शनद्वारे पोहोचवला जातो. याचे परिणाम तात्काळ दिसू लागतात या तेलामध्ये सर्वसामान्यपणे तेल, बेंन्झाइल अल्कोहोल आणि लिडोकेन असतं. यात तेलाचं प्रमाण 85 टक्के, लिडोकेन (वेदनाशामक) 7.5 टक्के आणि अल्कोहोल 7.5 टक्के असतं. सिंथॉल तेलाचा वापर स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी केला जातो. मात्र तो कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे धमन्यांचं नुकसान, मायोकॉर्डियल इन्फ्रॅक्शन, सेरेब्रल स्ट्रोक पल्मनरी, ऑईल एम्बोलिक, फुफ्फुसातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज होणं, सेरेब्रल स्ट्रोक किंवा संसर्ग यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या तेलाचे दुष्परिणाम सिजमोनच्या शरीरावरही दिसून आले.

काही वर्षांपूर्वी पोपी नावाच्या रशियन बॉडी बिल्डरने आपल्या ट्रायसेप्सवर या तेलाचं इंजेक्शन टोचलं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरातील मांस सडून गेलं. हे खराब मांस काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली होती. 24 वर्षाच्या किरिल टेरेशिन याने सिंथॉलचं इंजेक्शन घेतल्यानंतर त्याच्या बायसेप्समध्ये पाणी झालं. हे पाणी काढून टाकण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ``अजून काही वेळ उशीर झाला असता, तर किरिलचा मृत्यू झाला असता,`` असं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं.

First published:

Tags: Health, Lifestyle