हे काय भलतंच! 8 महिन्यांच्या 'डेटिंग' नंतर बॉडी बिल्डरनं केलं Sex Dall शी लग्न; पाहा VIDEO

हे काय भलतंच! 8 महिन्यांच्या 'डेटिंग' नंतर बॉडी बिल्डरनं केलं Sex Dall शी लग्न; पाहा VIDEO

प्रेम आंधळं असतं हे ठीक आहे, पण त्याला खरा-खुरा हाडामासाचा माणूस आणि एक निर्जीव बाहुली यातला फरकही समजू नये म्हणजे जरा अतीच झालं ना! पाहा VIEDO

  • Share this:

नूर सुलतान (कझाकस्तान), 26 नोव्हेंबर : प्रेम आंधळं असतं, हे म्हणतात. प्रेमाला गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, असा भेद मान्य नसतो.. हे ठीक; पण प्रेमाला खरा-खुरा हाडामासाचा माणूस आणि एक निर्जीव खेळणं किंवा बाहुली यातला फरकही समजू नये म्हणजे जरा अतीच झालं ना! कझाकिस्तानमधल्या एका बॉडीबिल्डरने अशाच एका अतरंगी प्रेमाचा दाखला दिला आहे. त्याने चक्क एका सेक्स डॉलशी लग्न केलं आहे.

युरी टोलोचको हा प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे. मागील आठ महिन्यांपासून तो त्याच्या सेक्स डॉलला 'डेट' करत असून त्यानं तिला चक्क लग्नाची मागणी घातली होती. आता या महिन्यात त्याने  तिच्याशी खरंखुरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचा VIDEO सुद्धा सोशल मीडियावर त्याने शेअर केला आहे.

सेक्स डॉल ही एक रबर, प्लश, सिलिकॉन किंवा थर्मोप्लास्टिकपासून तयार केलेली हुबेहुब स्रीसारखी दिसणारी बाहुली असते. तिचा उपयोग कामवासना पूर्ण करण्यासाठी केला जातो.

आपल्यासारख्या सामान्यांसाठी ही गोष्ट खूप विचित्र आणि टोकाची वाटू शकेल, पण हा युरी टोलोचको मात्र त्या कामदेवी बाहुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. त्याच्या सेक्स डॉलचं नाव मार्गो असून ती सिलिकॉनपासून तयार केली आहे. टोलचकोने आपल्या या लग्नाचा व्हिडीओ Instagram वर पोस्ट केला आहे. त्यानंतर आता सोशल मीडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यापूर्वी, युरी टोलोचको मार्च महिन्यात सिलीकॉन जोडीदाराबरोबर लग्न करणार होता. परंतु Coronavirus च्या साथीमुळे हे लग्न पुढे ढकललं. ऑक्टोबर महिन्यात एका ट्रान्सजेण्डरच्या रॅलीत टोलचकोवर हल्ला झाल्यानंतर त्याला हा निर्णय आणखी काही महिने पुढे ढकलावा लागला होता. परंतु अखेर या 'जोडप्या'ने नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं आहे. कॉम्प्लेक्सच्या वृत्तानुसार मागील 8 महिने तो मार्गोबरोबर नात्यात असून मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याने नुकतंच तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्या शरीरात आवश्यक ते बदल केले होते.

पहिल्यांदा त्याने मार्गो हिला जगासमोर सादर केलं त्यावेळी त्याच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या लुकमध्ये थोडे बदल करण्यात आले. यामध्ये तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून खऱ्या डॉक्टरांनी तिच्यावर ही शस्त्रक्रिया केली म्हणे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार टोलोचको याने सेंट्रल युरोपियन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार मार्गोला चालता येत नसून आधारानेच चालावं लागतं. मार्गो एका लोकल बारमध्ये वेट्रेसचे काम देखील करते. कॉम्प्लेक्सच्या रिपोर्टनुसार या दोघांची भेट एका बारमध्ये झाली होती. यामध्ये एक व्यक्ती तिच्याबरोबर चुकीचा व्यवहार करत होता. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं.

First published: November 26, 2020, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading