मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Flipkart वरून मागवले 'Nothing' पण मिळाले 'Nothing', का संतापला अभिनेता? वाचा सविस्तर

Flipkart वरून मागवले 'Nothing' पण मिळाले 'Nothing', का संतापला अभिनेता? वाचा सविस्तर

 अभिनेता पारस कलनावत याने फ्लिपकार्ट (Blunder in delivery of flipkart company) कंपनीवरून Nothing Earphones ऑर्डर केले, मात्र प्रत्यक्षात त्याला एक रिकामा बॉक्स देण्यात आला.

अभिनेता पारस कलनावत याने फ्लिपकार्ट (Blunder in delivery of flipkart company) कंपनीवरून Nothing Earphones ऑर्डर केले, मात्र प्रत्यक्षात त्याला एक रिकामा बॉक्स देण्यात आला.

अभिनेता पारस कलनावत याने फ्लिपकार्ट (Blunder in delivery of flipkart company) कंपनीवरून Nothing Earphones ऑर्डर केले, मात्र प्रत्यक्षात त्याला एक रिकामा बॉक्स देण्यात आला.

मुंबई, 15 ऑक्टोबर :  अभिनेता पारस कलनावत याने फ्लिपकार्ट (Blunder in delivery of flipkart company) कंपनीवरून Nothing Earphones ऑर्डर केले, मात्र प्रत्यक्षात त्याला एक रिकामा बॉक्स देण्यात आला. अनेकजण सध्या ऑनलाईन (Shopping on online platform) शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे अबिनेता पारसनं फ्लिपकार्टवरून Nothing Earphones ऑर्डर केले. आपल्या इयरफोनची (Nothing earphones) तो उत्कंठेनं वाट पाहत होता. मात्र जेव्हा त्याने पार्सल फोडून पाहिलं, तेव्हा त्याचा मोठा भ्रमनिरास झाला.

खोकं होतं रिकामं

Nothing Earphones चं रिकामं पाकिट पाहून अभिनेता पारसचा संताप झाला. त्यानं तातडीने हा प्रकार ट्विटरच्या माध्यमातून चव्हाट्यावर मांडला. So Here I Have Received Nothing In @nothing box From @Flipkart, असं म्हणत त्याने फ्लिपकार्टवर जोरदार टीका केली. फ्लिपकार्टची सर्व्हिस गेल्या काही दिवसांपासून खराब होत चालली असून त्यामुळेच ही कंपनी लवकरच आपलं गुडविल आणि ग्राहकांचा विश्वास हरवून बसेल, असं त्यानं म्हटंल आहे.

कंपनीकडून सारवासारव

कंपनीनं त्याच्या ट्विटला उत्तर देत आपण मदत करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करताना चूक सुधारण्याची तयारी फ्लिपकार्ट कंपनीनं दाखवली. मात्र असेच अनुभव आलेल्या अनेक नेटिझन्सनी हे निमित्त साधत आपले अनुभव ट्विटरवर मांडले. फ्लिपकार्ट ही एकेकाळची दिग्गज कंपनी आहे. या कंपनीने जर आपला कारभार सुधारला नाही, तर भविष्यात या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणं लोक थांबवतील, अशी टिप्पणी एका नेटिझन्सनं केली.

नथिंग फॉर नथिंग

अभिनेता पारसनं मागवलेल्या हेडफोनच्या ब्रँडंचं नाव Nothing असणं आणि प्रत्यक्षात त्याच्या बॉक्समध्ये Nothing असण, असा शाब्दिक खेळही अनेकजण ट्विटरवर खेळताना दिसले. मात्र या निमित्तानं अपेक्षित वस्तू मिळाली नाही, तर कसा भ्रमनिरास होतो, याचा अनुभव पुन्हा एका आला.

First published:
top videos

    Tags: Business, Flipkart, Online shopping