S M L

भारतीय महिलांनो सावधान ! तिशीतच सुरु होतायत रक्तदाबाच्या तक्रारी

वाढते ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचा टप्पा तिशीमध्ये आला आहे. या तक्रारींमध्ये रक्तदाबाच्या सर्वाधिक तक्रारी आता गर्भारपणामध्ये स्त्रियांना भेडसावत आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 02:26 PM IST

भारतीय महिलांनो सावधान ! तिशीतच सुरु होतायत रक्तदाबाच्या तक्रारी

नेहा भोयर, 17 मे : वाढते ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचा टप्पा तिशीमध्ये आला आहे. या तक्रारींमध्ये रक्तदाबाच्या सर्वाधिक तक्रारी आता गर्भारपणामध्ये स्त्रियांना भेडसावत आहे. याबाबतीत अकराव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे सहाव्या क्रमांकावर आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गर्भावस्थेमध्ये वाढणारा रक्तादाब हे आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजीचे कारण ठरत आहे.

गर्भावस्थेमधला वाढता रक्तदाब

- राज्यात गर्भावस्थेमधील उच्च रक्तदाबाच्या 35 हजार 61 तक्रारी

- सार्वजनिक रुग्णालयांमधील 27,871 तक्रारी

Loading...
Loading...

- खासगी रुग्णालयांतून 7,190 तक्रारी

- मुंबईमध्ये 5,193 गर्भवती स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास

- राज्यात 913, मुंबईत 293 जणींना गर्भावस्थेच्या पाचव्या आणि सहाव्या

महिन्यांत उच्च रक्तदाबाचा त्रास

- राज्यात 23 हजार 899 तर मुंबईत 4,744 स्त्रियांवर उच्च रक्तदाबामुळे वैद्यकीय उपचार सुरू

काय आहेत कारणं ?

- पहिल्या प्रसूतीच्या वेळी बाळ सुरक्षित असेल का ?

- वेदना होतील का ?

- बाळाचा सांभाळ करायला जमेल का ?

- अशा अव्यक्त भीती

- 'पहिलटकरणीं'मध्ये रक्तदाबाचा त्रास जास्त

- मूल उशिरा होऊ देण्याचा घेतला जाणारा निर्णय

- ताणतणाव, धावपळ ही महत्त्वाची कारणं

- अनेकदा गरोदरपणामधील रक्तदाब लक्षात येत नाही

- रक्तदाब असेल तर गोळ्या वेळेवर घेतल्या जात नाहीत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 02:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close