News18 Lokmat

VIRAL VIDEO: ऑनकॅमेरा ऑक्टोपस खाणं ब्लॉगरला पडलं महागात, पाहा काय झालं

लाइव्ह स्ट्रीमिंग शोची होस्ट असलेली ही तरुणी चीनधील लोकप्रिय ब्लॉगरही आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 07:06 PM IST

VIRAL VIDEO: ऑनकॅमेरा ऑक्टोपस खाणं ब्लॉगरला पडलं महागात, पाहा काय झालं

मुंबई, 9 मे : आजकाल प्रसिद्धीसाठी ऑन कॅमेरा काहीही कोणताही स्टंट करायला लोक तयार असतात. पण अनेकदा असे स्टंट करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशीच एक घटना नुकतीच चीनमध्ये घडली. चीनमधील एका लाइव्ह स्ट्रीमिंग शोमध्ये ऑनकॅमेरा जिवंत ऑक्टोपस खाण्याचा स्टंट त्या शोच्या होस्टला चांगलाच महागात पडला. या ऑक्टोपसनं उलट त्या तरुणीवर हल्ला करत तिला जखमी केलं. 'सीसाइड गर्ल लिटल सेव्हन' या नावानं ओळखली जाणाऱ्या या तरुणीनं या  घटनेचा 50 सेकंदांचा  व्हिडिओ Kuaishou या YouTube चॅनेलवर शेअर केला.

लाइव्ह स्ट्रीमिंग शोची होस्ट असलेली ही तरुणी चीनधील लोकप्रिय ब्लॉगरही आहे. तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी जिवंत ऑक्टोपस हातात पकडून त्याला खाण्याचा प्रयत्न करत असलेली दिसते. पण ती जशी त्याला खाण्यासाठी तोंडाजवळ नेते तसा तो उलट तिच्यावरच हल्ला करतो आणि आपल्या सर्व नांग्यानी तिचा चेहरा पकडून तिचं रक्त शोषून घेण्यास सुरुवात करतो. ती तरुणी ऑक्टोपसला तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न करते मात्र यामुळे तिला वेदना होतात. पण शेवटी ती त्याला जोरात खेचून बाजूला करते. पण यामुळे तिच्या चेहऱ्यावर रक्त निघालेलं दिसतं.


यानंतर ती तरुणी हा अनुभव खूप वेदनादायी असल्याचं सांगते. पण एवढं झाल्यानंतरही ती मी पुढच्या वेळी जिवंत ऑक्टोपस नक्की खाऊन दाखवेन असं सांगताना दिसते. 'सीसाइड गर्ल लिटल सेव्हन' नावानं ओळखली जाणारी ही तरुणी Kuaishou या YouTube चॅनेलवरुन सीफुडचे लाइव्ह शो करते.


Loading...

पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसली राखी सावंत, चाहते म्हणाले गद्दार


अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...