मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

3) ब्लॅक कॉफी

कॉफीमध्ये कॅफिन असते जे तुमच्या उर्जेला त्वरित वाढ देते. चयापचय वाढवण्यास देखील ते उपयुक्त ठरते. ब्लॅक कॉफी हे प्री-वर्कआउट पेयांपैकी एक आहे. कारण ते तुम्हाला अधिक ऊर्जा देते, ज्यामुळे तुमच्या वर्कआउट सत्रात फायदा होतो. याव्यतिरिक्त, ते चरबी जलद बर्न करण्यास देखील मदत करते. मात्र, आपण ही कॉफी साखर न घालता प्यावी.

3) ब्लॅक कॉफी कॉफीमध्ये कॅफिन असते जे तुमच्या उर्जेला त्वरित वाढ देते. चयापचय वाढवण्यास देखील ते उपयुक्त ठरते. ब्लॅक कॉफी हे प्री-वर्कआउट पेयांपैकी एक आहे. कारण ते तुम्हाला अधिक ऊर्जा देते, ज्यामुळे तुमच्या वर्कआउट सत्रात फायदा होतो. याव्यतिरिक्त, ते चरबी जलद बर्न करण्यास देखील मदत करते. मात्र, आपण ही कॉफी साखर न घालता प्यावी.

कॉफी प्यायल्यानंतर उत्साह वाढतो, नैराश्य कमी होतं अगदी हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. फक्त कॉफी कशी करायची, किती आणि कधी प्यायची हे माहिती हवं.

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी घेतली जाते. कॉफीमध्ये अनेक प्रकार आहेत. यात ब्लॅक कॉफीमध्ये (Black Coffee) कॅफिनव्यतिरिक्त शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळतात. याचा उपयोग करून अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. एवढेच नाही, तर कॉफी मेंदूला चांगलं कार्य करण्यास मदत करते आणि भरपूर ऊर्जा देते. 'हेल्थलाइन'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन चयापचय क्रिया वाढवून शारीरिक कार्यक्षमता वाढवतं. तसंच यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी3, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी2 सुद्धा असतं. याचा फायदा आरोग्याला होतो.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

नैराश्य कमी करते : चिंता, तणाव, जास्त झोप, डोकेदुखी आणि आळस या गोष्टी ब्लॅक कॉफीच्या सेवनाने कमी होतात. ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे मेंदू आणि मज्जासंस्था सक्रिय होतात. सुस्ती आणि आळस दूर करण्यासाठी ही कॉफी घेतली जाते.

तुम्ही खात असाल तूप-रोटी, पण हे महाशय खातात पानं आणि लाकडाचा भुसा

वजन कमी होतं : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार म्हणजे ब्लॅक कॉफीचं सेवन. ब्लॅक कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे चयापचय क्रिया वाढते. यामुळे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुधारते आणि शरीरात उष्णता निर्माण होते. याचा फायदा वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

स्टॅमिना वाढवते : जिममध्ये जाऊन आल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर ब्लॅक कॉफीचं सेवन स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली : ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली असते. दररोज 1 किंवा 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्ट्रोकसह कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होतो. परंतु त्यात साखर, दूध घालू नये.

या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही कमी वयातच दिसता वृद्ध; आजच बदलायला हव्यात

ब्लॅक कॉफीच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी : ब्लॅक कॉफीचं सेवन करून तुम्ही मधुमेहाला (Diabetes) दूर ठेवू शकता. मधुमेहाचा धोका कमी करण्यास ब्लॅक कॉफी मदत करते. तसंच ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

अशी बनवायची ब्लॅक कॉफी (How To Make Black Coffee) -

पहिल्यांदा एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते उकळा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा ब्लॅक कॉफी पावडर घाला आणि एका कपमध्ये ओतून प्या.

कॉफी पिण्याची योग्य वेळ -

ब्लॅक कॉफीचं सेवन कधीही उपाशी पोटी करू नये. नाश्ता केल्यानंतर ही कॉफी घेऊ शकता.

First published:

Tags: Coffee, Health Tips