...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

आपल्या फिट लाइफस्टाइलमुळेच मोदी फार कमी आजारी पडतात. नियमित योग आणि संतुलित आहारामुळे ते स्वतःला नेहमीच फिट ठेवतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 12:37 PM IST

...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी त्यांच्या पेहरावापासून ते खाण्या- पिण्यापर्यंत फार स्टायलिश आहेत. ते एक अपडेट आणि ट्रेण्डी लाइफस्टाइल फॉलो करतात. आपल्या फिट लाइफस्टाइलमुळेच मोदी फार कमी आजारी पडतात. नियमित योग आणि संतुलित आहारामुळे ते स्वतःला नेहमीच फिट ठेवतात. मोदी शाकाहारी आहेत ते दिवसभरात काय काय खातात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळचा नाश्ता-

मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम पूर्ण झाल्यानंतर रात्री कितीही उशीरा झोपले तरी दुसऱ्या दिवशी ते पहाटे 5 वाजता उठतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते योगासनं करतात. यानंतर नाश्त्यात ते साधं गुजराती खाणं खातात. त्यातही त्यांना पोहे फार आवडतात. याशिवाय ते सकाळी खिचडी, उपमा, खाखरा खायला प्राधान्य देतात. सकाळी नाश्त्यासोबत त्यांना आल्याचा चहा प्यायला आवडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी चहाचे चाहते आहेत.

दिवसातलं जेवण-

दुपारच्या जेवणात मोदी मसाले नसलेला संतुलित आहार घेतात. दुपारच्या जेवणात शक्यतो डाळ, भात, बाजी आणि दही असतं. गव्हाच्या चपाती ऐवजी ते गुजराती भाकरी खाण्याला प्राधान्य देतात. याशिवाय पंतप्रधानांना संसदेतील कँटीनमधील फ्रूट सलाड खाणं फार आवडतं.

Loading...

रात्रीचं जेवणं-

नरेंद्र मोदी यांचं रात्रीचं जेवण फार हलकं फुलकं असतं. ते रात्री गुजराती खिचडी खाणं पसंत करतात. याशिवाय भाकरी, डाळ आणि मसाल्यांशिवायची भाजी खातात. कधी कधी तर ते फक्त उकडलेल्या भाज्याच खातात.

उपवास स्पेशल-

पंतप्रधान अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय उपवास करतात. कारण त्यांच्या मते, एक दिवस उपवास केल्याने शरीर स्वस्थ राहतं. उपवासाच्या दिवशी मोदी मीठ न घातलेलं फक्त लिंबू पाणी पितात.

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

या लक्षणांवरून ओळखा तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही

आपल्या आईपासून या 5 गोष्टी कधीही लपवू नका, नंतर होईल पश्चाताप!

या तीन गोष्टी खाणं पुरुषांनी कधीही सोडू नये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...