डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेताय; स्वत:चा जीव धोक्यात घालताय

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेताय; स्वत:चा जीव धोक्यात घालताय

गर्भनिरोधक गोळ्यांचे (birth control pills) दुष्परिणामही आहेत आणि अशा गोळ्या डॉक्टरांना न विचारतात घेत असाल तर तुमच्या जीवावर बेतू शकतं.

  • Last Updated: Oct 26, 2020 11:50 PM IST
  • Share this:

असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी हा सोपा मार्ग आहे. मात्र वारंवार या गोळ्या घेतल्याने त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिमाम होतात. या गोळ्यांचं नियमित सेवन केल्यानं हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. परस्पर या गोळ्या घेणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, 25 ते 45 वयोगटातील महिलांनी या गोळ्या घेणं योग्य आहे. मात्र यापेक्षा कमी वयाच्या मुलींनी या गोळ्यांचं वारंवार सेवन केलं तर त्यांची पुनरुत्पादक प्रणाली बिघडू शकते आणि त्याच्या विकासात देखील बाधा येते. तरुण मुली ज्यांच्यामध्ये संप्रेरक पातळी अद्याप स्थिर नसते त्यांनी या गोळ्या घेणं धोकादायक आहे. अशा मुलींना एंडोमेट्रिओसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमसारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त त्यांना एक्टोपिक गर्भधारणा म्हणजेच गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव, संसर्ग आणि मृत्यूही ओढावू शकतो.

याशिवाय नियमित गोळ्या घेतल्याने त्याचे का दुष्परिणाम होऊ शकतात पाहुयात.

डोकेदुखी, उलटी

या गोळ्यांचे नियमित सेवन केल्याने वंध्यत्व, कामवासना कमी होणं, अनियमित मासिक पाळीमुळे त्वचेची अॅलर्जी यासारख्या समस्या देखील उद्भवतात. या गोळ्यांचं सेवन केल्यानं स्तनामध्ये सूज येऊ शकते. या गोळ्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी करण्यात प्रमुख भूमिका निभावतात ज्यामुळे डोकेदुखी होते. काही प्रकरणांमध्ये उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणं इत्यादी तक्रारीदेखील उद्भवतात.

मूड स्विंग

या गोळ्यांमध्ये उपस्थित सिंथेटिक संप्रेरक, मूड स्विंगससाठी कारणीभूत असतात.याने चिडचिडेपणा अधिक वाढतो. बर्‍याच संशोधनातून असं समोर आलं आहे की या गोळ्यांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचतो.

वजन वाढतं

या गोळ्यांचं नियमित सेवन केल्यानं काही स्त्रियांचं वजन वाढू शकतं. या गोळ्यांचं सेवन केल्यानं शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये द्रवपदार्थाचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे वजन नियंत्रित होत नाही.

उच्च रक्तदाब असल्यास गोळी घेऊ नका

गर्भनिरोधक गोळ्यात लेव्होनोर्जेस्ट्रल असतं ज्यामुळे एखाद्या महिलेस अॅलर्जी होऊ शकते. म्हणून गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. तुम्हाला इतर कोणताही आजार असल्यास, त्यावरील काही औषधं घेत असाल तर गर्भनिरोधक गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. ज्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब आहे, त्यांनी या गोळ्या घेऊ नये. गर्भनिरोधक गोळ्या वारंवार घेतल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्यांची निर्मिती यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - निरोध : प्रकार, कसे वापरावे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 26, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading