मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गर्भनिरोधक गोळ्या ठरतील धोकादायक, महिलांच्या SEX लाइफवर देखील होतो परिणाम

गर्भनिरोधक गोळ्या ठरतील धोकादायक, महिलांच्या SEX लाइफवर देखील होतो परिणाम

सप्लीमेंटचा आरोग्याला फायदा होतो.

सप्लीमेंटचा आरोग्याला फायदा होतो.

गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्याबरोबरच सेक्स लाईफवर (Sexual Life) देखील पडतो. जाणून घ्या या गोळ्यांचे इतर साइड इफेक्ट्स

मुंबई, 06 जानेवारी: लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive Pills) महिलांसाठी सर्वात सोपा मार्ग ठरतात. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी हा एक उपाय आहे. परंतु सतत याचा वापर केल्याने महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर (Health) याचा मोठा परिणाम होऊ शकतो. या गोळ्यांचं नियमित सेवन केल्यानं हॉर्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. परस्पर या गोळ्या घेणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मेडिकल न्यूज टुडेने दिलेल्या माहितीनुसार या गोळ्यांचा प्रभाव महिलांच्या मानसिक आरोग्याबरोबरच सेक्स लाईफवर (Sexual Life) देखील पडतो. यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या गोळ्यांमध्ये प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनऐवजी प्रोजेस्टिन नावाच्या सिंथेटिक हॉर्मोनचा वापर केला जातो. गर्भधारणा होण्यासाठी किंवा न होण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन आणि एस्ट्रोजेन या दोन हॉर्मोन्सची महत्त्वाची भूमिका असते. या गोळ्यांचा सतत वापर केल्याने महिलेला गर्भधारणा होत नाही. या स्तिथीला ओरल कॉन्ट्रासेप्टिव (Oral Contraceptive) म्हणतात. जाणून घ्या या गर्भनिरोधक गोळ्यांचे महिलेच्या शरीरावर होणारे परिणाम (Side Effects) काय आहेत.

(हे वाचा-6 वर्षे रुग्णालयात होता रुग्ण, बिलाऐवजी हॉस्पिटलनंच दिले 53 लाख; वाचा काय झालं?)

स्तनांना सूज

या गोळ्यांचं सेवन केल्यानं स्तनांमध्ये सूज येऊ शकते. त्याचबरोबर स्तनांचा आकार देखील वाढत असल्याची अनेक महिलांची तक्रार असते. त्यामुळे या गोळ्यांच्या सेवनानंतर स्तनांचा सूज आल्यासारखे वाटल्यास जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे.जास्त त्रास जाणवायला लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सेक्स लाईफवर प्रभाव

या गोळ्यांचा केवळ शारीरिक प्रभावच नाही तर सेक्स लाईफवर देखील प्रभाव पडतो. दीर्घ काळापर्यंत या गोळ्यांचे सेवन केल्यास याचा खूप वाईट परिणाम सेक्स लाईफवर होतो. या गोळ्या लो सेक्स ड्राइव्हचे कारण बनू शकतात. दीर्घ काळासाठी तुम्ही लो सेक्स ड्राइव्हला सामोरे जात असाल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

व्हजायनल डिस्चार्ज (Vaginal Discharge)

योनी मार्गातून (Vagina) व्हाइट डिस्चार्ज होणं, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. पण याबरोबर खाज, जळजळ किंवा इरिटेशन या गोष्टी होत असतील तर हे यीस्ट इन्फेक्शन असू शकतं, त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भनिरोधक गोळ्यांच्या अति सेवनामुळे हा धोका संभवतो. पिवळ्या रंगाचं डिस्चार्ज होत असेल तर यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा सेक्शुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन होऊ शकतं.

(हे वाचा-मुलगी झाली होsss! सलून चालवणाऱ्या 2 भावांनी आनंदात ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर)

वाढत्या वजनाची भीती

या गोळ्यांचं नियमित सेवन केल्यानं काही स्त्रियांचं वजन (Weight Gain) वाढू शकतं. या गोळ्यांचं सेवन केल्यानं शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फ्लूइड रिटेंशन वाढतं, ज्यामुळे वजन नियंत्रित होत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये बदल करू  शकता.

डोकेदुखी, उलटी

या गोळ्यांचे नियमित सेवन केल्याने डोकेदुखी, उलटी तसेच  अनियमित मासिक पाळीमुळे त्वचेची अॅलर्जी यासारख्या समस्या देखील उद्भवतात. या गोळ्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी करण्यात प्रमुख भूमिका निभावतात ज्यामुळे डोकेदुखी होते. काही प्रकरणांमध्ये उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणं इत्यादी तक्रारीदेखील उद्भवतात.

First published:

Tags: Lifestyle