हे April Fool बनाया! मांजर आणि चिमणीचा हा VIDEO एकदा पाहाच

हे April Fool बनाया! मांजर आणि चिमणीचा हा VIDEO एकदा पाहाच

April Fool च्या दिवशी मांजर आणि चिमणीचा (Cat-Bird Video) हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : आज एप्रिल फूलचे (April Fool)  बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चक्क एका चिमणीने मांजराला  (Cat-Bird Video) एप्रिल फूल बनवलं आहे. शिकार करायला आलेल्या मांजरावर चिमणीने अत्यंत हुशारीने मात केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा  (IFS Officer Sushanta Nanda) यांनी आपल्या ट्विटवरवर मांजर आणि चिमणीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला त्यांनी एप्रिल फूल असं कॅप्शनही दिलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एका चिमणीला पाहून मांजर तिच्याजवळ जाते. मांजर आपली आता शिकार करणार हे चिमणीला कळतं. मग ती त्यावेळी हुशारीने काम चालवते. जमिनीवर पडून ती मृत झाल्याचं नाटक करते. त्यावेळी मांजर तिला हात लावते आणि हळूच हलवते. पण चिमणी काही उठत नाही. मग मांजर तिथंच जवळ बसून राहते.

हे वाचा - क्या बात है! जणू काही कापूसच, इतक्या सहज उचलून नेला Gas Cylinder; पाहा VIDEO

मांजरीची नजर चिमणीवरून हटताच चिमणी संधी साधते आणि तिथून भुर्रकन उडून जाते. मांजर तिला पकडण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत चिमणी वर उंचापर्यंत गेलेली असते. या व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 1, 2021, 6:51 PM IST

ताज्या बातम्या