मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Bija Sanskar : गर्भधारणेपूर्वी दाम्पत्याने नक्की करावे शरीर शुद्धीकरण; आयुर्वेदानुसार आहेत हे फायदे

Bija Sanskar : गर्भधारणेपूर्वी दाम्पत्याने नक्की करावे शरीर शुद्धीकरण; आयुर्वेदानुसार आहेत हे फायदे

Bija Sanskar, Preconceptional Care In Ayuderveda In Marathi - निरोगी गर्भधारणा होण्यासाठी प्रजननक्षम काळ, गर्भाशयाचं आरोग्यपूर्ण वातावरण, योग्य प्रकारे रक्ताभिसरण, तसंच बीजांडं आणि शुक्राणूंचा चांगला दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

Bija Sanskar, Preconceptional Care In Ayuderveda In Marathi - निरोगी गर्भधारणा होण्यासाठी प्रजननक्षम काळ, गर्भाशयाचं आरोग्यपूर्ण वातावरण, योग्य प्रकारे रक्ताभिसरण, तसंच बीजांडं आणि शुक्राणूंचा चांगला दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

Bija Sanskar, Preconceptional Care In Ayuderveda In Marathi - निरोगी गर्भधारणा होण्यासाठी प्रजननक्षम काळ, गर्भाशयाचं आरोग्यपूर्ण वातावरण, योग्य प्रकारे रक्ताभिसरण, तसंच बीजांडं आणि शुक्राणूंचा चांगला दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 25 जानेवारी : 'सुरुवात चांगली झाली, की निम्मं काम तिथेच होतं' ही म्हण गर्भधारणेच्या नियोजनाला नेमकी लागू पडते. आयुर्वेद केवळ गर्भधारणेनंतरच्या काळजीचा नव्हे, तर गर्भधारणेसाठी दाम्पत्याला तयार करण्याचाही विचार करतो, त्यावर भर देतो. शेतकरी त्याच्या शेतात नवं पीक घेण्याचा विचार करतो, तेव्हा त्याला वातावरणाची अनुकूलता, मातीची उत्पादन क्षमता, योग्य सिंचन व्यवस्था आणि बियाण्याचा दर्जा या घटकांचा विचार करावा लागतो.

    यांपैकी कोणत्याही एका घटकामध्ये थोडं जरी इकडे-तिकडे झालं, तरी त्याच्या पिकाचा दर्जा घसरतो, पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. अगदी त्याचप्रमाणे, निरोगी गर्भधारणा होण्यासाठी प्रजननक्षम काळ, गर्भाशयाचं आरोग्यपूर्ण वातावरण, योग्य प्रकारे रक्ताभिसरण, तसंच बीजांडं आणि शुक्राणूंचा चांगला दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या गोष्टी साध्य करण्यासाठी आयुर्वेद दाम्पत्याच्या गर्भधारणापूर्व आरोग्याला (Preconception Health & Well being) सर्वांत जास्त महत्त्व देतो.

    पती-पत्नी अशा दोघांची शारीरिक तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांच्या शरीराची शुद्धी करण्यासाठी वमन, विरेचन, बस्ती आदी पंचकर्म उपचारांचा सल्ला दिला जातो. त्याशिवाय फर्टिलिटी म्हणजेच प्रजननक्षमता सुधारण्यासाठी औषधांबरोबरच त्या दाम्पत्याने एक महिना शरीरसंबंध न ठेवण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे शरीराची कार्यपद्धती संतुलित राहते. तसंच बीजांडं आणि शुक्राणूंचा दर्जाही सुधारतो.

    याला बीजसंस्कार असं म्हणतात. पुरुष आणि स्त्रीच्या बीजामध्ये (म्हणजे शुक्राणू आणि बीजांड) सुधारणा व्हावी, यासाठी बीजसंस्कार केले जातात. त्यात जीवनशैलीत सुधारणा, आहारात सुधारणा, प्राणायाम, योगासनं, ध्यानधारणा करणं यांसह पंचकर्म उपचार आणि प्रजननक्षमता वाढवणारे आयुर्वेदीय औषधोपचार यांचा समावेश असतो.

    गर्भधारणेचं नियोजन करण्याच्या किमान 3 ते 6 महिने आधी दाम्पत्याने बीजसंस्कार सुरू करणं गरजेचं आहे. क्लिनिकली असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे, की बीजसंस्कार केल्यानंतर गर्भवती झालेल्या महिलेमध्ये गर्भधारणेसंदर्भातली गुंतागुंत उद्भवण्याचं प्रमाण कमी असतं. तसंच यामुळे गर्भाचं आरोग्य अधिक चांगलं असतं आणि आई होण्याचा प्रवास अधिक सुंदर होतो.

    (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy