पाटणा, 11 मार्च : डोक्यावर केस गळू लागले की तरुणीच नव्हे तर तरुणांनाही चिंता वाटते. डोक्यावर टक्कल पडलेला कुणालाच आवडत नाही. मग त्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण याचा परिणाम होईलच असा नाही. डोक्यावर पटकन केस येण्याचा सहजसोपा मार्ग म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. एका पोलिसानेही आपल्या लग्नापर्यंत आपल्या डोक्यावर केस यावेत यासाठी हाच मार्ग निवडला. पण हेअर ट्रान्सप्लांट करताच 24 तासांतच त्याचा मृत्यू झाला (Bihar police died after hair transplant).
बिहार स्पेशल आर्म्ड पोलीसमध्ये (BSAP) तैना असलेले 28 वर्षांचे मनोरंजन पासवान. त्याच्या डोक्याच्या पुढील भागावरील केस गळत होते, टक्कल पडलं होतं. 11 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. त्याआधी त्यांनी आपल्या डोक्यावर केस यावेत यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय़ घेतला. 9 मार्चला त्यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. हेअर ट्रान्सप्लांटनंतर पोलीस आपल्या क्वार्टरवर गेला. रात्री अचानक त्याच्या ़डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. छातीत जळजळ जाणवू लागली.
त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या इतर पोलीस जवानांनी त्याला हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या त्या सेंटरमध्ये नेलं, तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
हे वाचा - Shocking! बाळाला जन्म देताना अचानक बाहेर आले डोळे; प्रसूतीवेळी धक्कादायक प्रकार
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार मनोरंजन यांच्या कुटुंबाने हेअर ट्रान्सप्लांट सेंटरला मनोरंजन यांच्या कुटुंबासाठी जबाबदार ठरवलं आहे. याबाबत एसके पुरी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेंटरच्या संचालकांवर कारवाईची मागणी केली आहे.
मनोरंजन यांचा छोटा भाऊ आणि बिहार पोलिसात उपनिरीक्षक असलेले गौतम कुमार यांनी सांगितलं, "11 मे मनोरंजन यांचं लग्न होणार होतं. कित्येक दिवसांपासून त्यांच्या डोक्यावरील केस गळत होते म्हणून त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. पाटणातील बोरिंग रोडमवरील हेअर ट्रान्सप्लांट अँड स्किन केअर सेंटरमध्ये ते ट्रिटमेंट घेत होते"
हे वाचा - बोट मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा असं करता का?
"हेअर ट्रान्सप्लांटसाठी 51,000 रुपये सांगण्यात आले. डाऊनपेमेंट म्हणून मनोरंजन यांनी 11,767 रुपयांचं ऑनलाइन पेमेंटही केलं होतं. दर महिन्याला 4000 रुपये ईएमआय द्यायचा होता. मनोरंजन यांच्या मृत्यूनंतर सेंटरचा आणि सेंटरमधील काम करणाऱ्यांचा फोन बंद आहे", असंही गौतम यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.