मुंबई, 22 फेब्रुवारी : तुमच्या आधार कार्डात एखादी चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करायची तुमच्याकडे एकच संधी आहे. आम्ही सांगतोय डेट आॅफ बर्थची. तुमच्या आधारकार्डावरची तुमची जन्मतारीख चुकली असेल तर ती एकदाच दुरुस्त होऊ शकते. याची माहिती आधार कार्ड इश्यू करणाऱ्या UIDAIनं दिली आहे. आधारकार्ड एकदाच अपडेट करता येतं.
आधारकार्डात फक्त घरचा पत्ता सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागेल. सोबत जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट ठेवायलाच हवं.
काही अटी मान्य कराव्या लागतील
जन्मदाखल्याबद्दल UIDAI नं एक अट ठेवलीय. आधारमध्ये असलेली जन्म तारीख आणि अपडेटसाठी दिलेली जन्मतारीख यात 3 वर्षांहून जास्त अंतर असता कामा नये. असं असेल तर तुमचं अॅप्लिकेशन रद्द केलं जाईल. मग तुम्हाला तुमच्या स्थानिक आधार आॅफिसमध्ये जावं लागेल.
To update your DoB in Aadhaar, visit any Aadhaar Kendra with a valid document. If the variation in Year of Birth mentioned in your Aadhaar previously is more than 3 years, the request will be rejected. In that case, you will have to contact our regional office.#UpdateYourAadhaar pic.twitter.com/C3Th4rCLNX
— Aadhaar (@UIDAI) 10 February 2019
आधारमध्ये करायच्या बदलाची फी
आधारमध्ये नाव, पत्ता, ईमेल, आयडी, फोन नंबर यात अपडेट करायचं असेल तर किंवा बायोमेट्रिक अपडेटेशन करायचं असेल तर तुम्हाला 50 रुपये फी द्यावी लागेल. A4 शीट कलर प्रिंटसाठी 30 रुपये पडतील.
इतर गोष्टींसाठीची फी
आधारच्या यशस्वी जनरेशनसाठी 100 रुपये पडतील. बायोमेट्रिक अपडेटेशनसाठीही 100 रुपये पडतील. यात फिंगर प्रिंट्स आणि डोळ्यातली बाहुली आहे.
रजिस्टारसाठीही काही अटी आहेत
मशीनचा मालक रजिस्टार हवा
सुपरवायझर आणि व्हेरिफायर रजिस्टारचे कर्मचारी हवेत
आॅपरेटर रजिस्टारचा नियमित कर्मचारी किंवा काँन्ट्रॅक्टवरचा कर्मचारी हवा.
किंवा UIDIद्वारा नियुक्त हवा