2 आठवड्यांनंतर बच्चन कुटुंबाने खरेदी केली आणखी एक Mercedes; पुन्हा झाले ट्रोल

2 आठवड्यांनंतर बच्चन कुटुंबाने खरेदी केली आणखी एक Mercedes; पुन्हा झाले ट्रोल

2 आठवड्यांपूर्वीच अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी मर्सिडीज (mercedes) खरेदी केली होती, त्यावेळी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसवर मात केल्यानंतर कोरोना लॉकडाऊनमध्येच बच्चन कुटुंबाने (bachchchan) कोट्यवधी रुपयांची आलिशान कार (car) खरेदी केली होती. ही कार घेऊन फक्त 2 आठवडे झालेत आणि आता बच्चन कुटुंबाच्या गाड्यांच्या यादीत आणखी एक कार दाकल झाली आहे. या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमिताभ बच्चन (amitabh bachchan)  यांच्या कुटुंबातील नव्या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मर्सिडीज बेंझ जीएलएस  2020 (Mercedes-Benz GLS 2020) गाडी आहे. याच वर्षी ही कार लाँच झाली आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत 99.90 लाख रुपये आहे.

View this post on Instagram

Time for upgrade Big B's new wheels 🔥 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दोन आठवड्यांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी लक्झरी कार खरेदी केली होती. ज्याची किंमत तब्बल एक कोटी 38 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.

अमिताभ यांची ही कार पाहिल्यानंतर नेटिझन्स त्यांच्यावर संतप्त झाले. "अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. एकिकडे सोनू सूद कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करतो आहे आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन कोट्यवधींची कार खरेदी करत आहेत. अमिताभ यांनी सोनू सूदकडून काहीतरी शिकावं. इतका पैसा गाडीवर खर्च करण्यापेक्षा लोकांना दान करावं. त्यांची मदत करावी",  अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या होत्या.

हे वाचा - अखेर Kia Sonet ची किंमत जाहीर, कार पेक्षाही ठरली सर्वात स्वस्त SUV !

दरम्यान आता दोन आठवड्यांनीच आणखी एक कार खरेदी केल्याने बच्चन कुटुंब पुन्हा ट्रोल झालं आहे. नेटिझन्स या कारचा संबंध राजकारणाशी जोडत आहेत. ही कार म्हणजे महाराष्ट्र सरकारने दिलेलं गिफ्ट असावं. कारण खासदार जया बच्चन यांनी संसदेत त्यांची बाजू मांडली. तर काहींनी "थाली मे छेद करके काफी आगे बढ गए हैं", अशी कमेंट केली आहे.

हे वाचा - प्ले स्टोरवरून हटवलं Paytm; मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेलं App वापरता येणार की नाही?

अमिताभ यांच्याकडे आधीपासूनच अनेक मोठ्या कार आहेत.  रोल्स रॉयज ,मर्सिडीज-बेंज एस-क्लास S500, ऑडी A8L, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी यासारख्या महागड्या कारचा यात समावेश आहे. त्यांच्या या कलेक्शनमध्ये आणखी या दोन कारचा समावेश झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 18, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या