Home /News /lifestyle /

कोरोनाने हिरावली जन्मदाती; भुकेल्या तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी तासाभरातच धावून आल्या 30 आई

कोरोनाने हिरावली जन्मदाती; भुकेल्या तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी तासाभरातच धावून आल्या 30 आई

कोरोनाने आई हिरावल्यानंतर बाळाला (Baby's corona infected mother died) आईचं दूध (Breastmilk) मिळावं यासाठी बापाची धडपड सुरू झाली. अखेर त्या बाबाचे प्रयत्न यशस्वी झाले. त्यांच्या बाळाला आईचं दूध मिळालं.

    भोपाळ, 21 एप्रिल :   मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) अवघ्या 5 दिवसांच्या चिमुरड्यापासून कोरोनाने त्याच्या आईला हिरावून (Baby's corona infected mother died) घेतलं. बाळ पोटात असतानाच त्याच्या आईला कोरोना झाला. बाळासाठी ती हिमतीने या कोरोनाशी लढत होती. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ कुशीत येताच तिला खूप आनंद झाला. पण आईपण अनुभवण्याचं सुख आणि बाळाला आपल्या आईच्या कुशीत राहण्याचं सुख काही कालावधीपुरतंच मर्यादित होतं. बाळापासून कोरोनाने त्याची जन्मदाती आई हिरावली पण भुकेने व्याकूळ झालेल्या या तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी (Breasmilk) शेकडो आई धावून आल्या. गरोदरपणात कोरोना झालेल्या या महिलेला चिरायू रुग्णालयात (Bhopal chirayu hopsital) दाखल करण्यात आलं. तिथं तिची डिलीव्हरी झाली आणि तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर पाचव्या दिवशीच तिचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला.  सुदैवानं बाळ कोरोना निगेटिव्ह होतं. आई गेल्यानंतर सुरुवातीला  सुरुवातीला त्याला फॉर्म्युला मिल्क पाजण्यात आलं. पण पण ते वेळेआधीच जन्मल्याने त्याला आईच्या दुधाची गरज होती. हे वाचा - 'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती; डॉक्टरला कोसळलं रडू आपल्या बाळाला आईचं दूध मिळावं यासाठी बापाची धडपड सुरू झाली. बाळाच्या वडिलांनी आपल्या बाळाला दूध पाजणारी आई हवी म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केली. हा मेसेज खूप व्हायरल झाला. मेसेजवर दिलेल्या बाळाच्या वडिलांच्या मोबाइल नंबरवर फोन येऊ लागले. विश्वास हसणार नाही पण दैनिक भास्करच्या वृत्तानुसार तासाभरात तब्बल 30 मातांनी आपलं दूध त्या बाळाला देण्याची इच्छा व्यक्त केली. संध्याकाळपर्यंत तर हा आकडा 60 च्याही पार गेला. इतकंच नव्हे तर काही महिलांनी बाळ जोपर्यंत दूध पित आहे, तोपर्यंत ते आपल्याकडे ठेवण्यास हरकत नाही, असंही म्हटलं. हे वाचा - महिलांना Sanitary Napkin मोफत वाटणारी 'पॅडवुमन ऑफ काश्मीर' बाळाला दूध पाजण्यासाठी इतक्या माता आल्या की अखेर आता आपल्या बाळाला पुरेसं दूध मिळालं आहे, त्यामुळे मातांनी आपलं अमूल्य असं दूध वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन करणारा दुसरा मेसेज बाळाच्या वडिलांना लागला. आपल्या बाळाला एका वेळी 8 से 10 एमएल दुधाचीच गरज आहे. त्यामुळे मातांनी तितकंच दूध द्यावं. जेणेकरून कोणत्याच आईचं अमूल्य असं हे दूध वाया जा येऊ, असं बाळाच्या वडिलांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bhopal News, Madhya pradesh, Small baby, Woman

    पुढील बातम्या