मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लय भारी! भरतनाट्यम आणि हिपहॉपचं फ्युजन होतंय VIRAL

लय भारी! भरतनाट्यम आणि हिपहॉपचं फ्युजन होतंय VIRAL

 ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा हा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला होता.

ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा हा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला होता.

ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा हा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला होता.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : दोन नृत्यांचा मिलाफ किंवा फ्युजन हे काही फार काही वेगळं राहिलेलं नाही. पण भरतनाट्यम आणि हिपहॉप या दोन नृत्यांचं क्रॉसओव्हर या दोन महिलांनी एकदम जबरदस्त साधलं आहे. त्यांच्या भन्नाट नृत्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भरतनाट्यम् हे भारतातील सर्वांत जुनं पारंपरिक नृत्यांपैकी एक शास्रीय नृत्य आहे. हिपहॉप हा अमेरिकेतील रस्त्यावर सादर होणारा नृत्यप्रकार आहे. या दोन नृत्यांचा संगम साधणं हे जादूहून कमी नाही. युट्युब इंडियाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला. जॅक हारलोवच्या व्हॉट्स पॉप इन या गाण्यावर या नृत्यांगना सुरुवात करतात. या व्हिडीओला ‘ या आठवड्यात कोणीही क्रॉसओव्हरबद्दल विचारलं नव्हतं पण प्रत्येकालाच तो हवा आहे – हिपहॉप X भरतनाट्यम.’

या नृत्यातील एका नृत्यांगनेचं नाव उषा जेय आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा हा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला होता. उषा यांच्या हायब्रीड भरतनाट्यम या व्हिडीओच्या मालिकेतील हा एक व्हिडीओ आहे. उषा या मालिकेत दोन नृत्यांचा संगम करून नृत्याविष्कार सादर करतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी कॅप्शन दिलं होतं की, ‘ माझं पहिलं प्रेम कायमच हिपहॉप आहे पण मला भरतनाट्यमबद्दल प्रचंड ओढ आहे.’ आतापर्यंत केवळ इन्स्टाग्रामवरच या व्हिडीओला 25 हजार व्ह्यूज मिळाले असून या दोन नृत्यांगनांवर कमेंटमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

This week on crossovers nobody asked for but everybody deserves - Hip Hop X Bharatham

A post shared by YouTube India (@youtubeindia) on

अनेकांनी रेड हॅट, फायर आणि फोल्डेड हँडचे इमोजी टाकले आहेत. हा व्हिडिओ इतरांपेक्षा किती वेगळा आहे हे काहींनी कमेंटमध्ये वर्णन केलंय. सामान्य युट्बुबर्सचा कंटेंट शेअर केल्याबद्दल काही जणांनी युट्युबचं कौतुक केलंय. ‘@youtubeindia ने इतके कमी सबस्क्रायबर्स असलेल्या युट्यूब चॅनलला संधी दिल्याबद्दल आनंद झाला,’ असं एकाने म्हटलं आहे. दुसरा युझर्स म्हणतो, ‘ तुम्ही लहान क्रिएटर्सना महत्त्व देताय हे पाहून आनंद झाला.’

एकीने युट्युबवर नाराजीही व्यक्त केली आहे. ती म्हणते, ‘ केवळ 525 सबस्क्रायबर असलेल्या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही एवढं करत आहात, हे खरंय का, गूड @युट्युबइंडिया मला वाटतं अजून माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही असं तुम्हाला वाटत असावं.... काळजी नाही एखाद दिवशी मी ही निवडली जाईन.’

First published: