भारताच्या कोरोना लशीची ताकद वाढणार; COVAXIN मध्ये मिसळणार विशेष घटक

भारताच्या कोरोना लशीची ताकद वाढणार; COVAXIN मध्ये मिसळणार विशेष घटक

भारत बायोटेक (bharat biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) या कोरोना लशीमध्ये (corona vaccine) असा घटक मिसळणार आहे, ज्यामुळे या लशीची क्षमता वाढणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : जगभरात कोरोना लशींचं ट्रायल होतं आहे. मात्र या लशी यशस्वी झाल्यानंतर त्या किती वेळ कोरोनापासून संरक्षण देतील हा प्रश्न उपस्थित होतोच. यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. मेड इन इंडिया कोरोना लस अधिक मजबूत केली जाणार आहे. भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) लशीत एक असा घटक मिसळला जाणार आहे. ज्यामुळे ही लस अधिक काळापर्यंत कोरोनापासून सुरक्षा देईल.

भारतात सध्या तीन औषध कंपन्या कोरोना लशींचं क्लिनिकल ट्रायल करत आहेत. त्यामध्ये भारत बायोटेकची कोवॅक्सिन सर्वाधिक चर्चेत आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनमध्ये adjuvant Alhydroxiquim-II  हा घटक मिसळणार आहे. या घटकामुळे लशीची क्षमता अधिकच वाढेल. ही लस घेतल्यानंतर शरीरात ज्या अँटिबॉडीज तयार होणार त्या अधिक काळपर्यंत कोरोनापासून संरक्षण देतील. याबाबत ViroVax LLC सह करार झाल्याचं भारत बायोटेकनं सांगितलं आहे.

भारत बायटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णा इल्ला म्हणाले, "अँटिबॉडीज प्रतिक्रिया वाढवण्यासाठी adjuvant हा घटक लशीमध्ये असणं खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त काळ रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारी प्रभावी अशी लस देण्यासाठी भारत बायोटेक आणि ViroVax ने करार केला आहे.

हे वाचा -  जुलैनंतर 5 पैकी केवळ एका व्यक्तीला मिळणार Corona Vaccine, वाचा सरकारचा प्लॅन

दरम्यान जुलै 2021 पर्यंत 20-25 कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली. भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोना इतकेच भयंकर आहेत 'हे' 4 आजार, घेतला कोट्यावधी लोकांचा जीव

ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या