मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Covisheild पेक्षा स्वस्त की महाग? स्वदेशी कोरोना लस Covaxin लशीची किंमत पाहा

Covisheild पेक्षा स्वस्त की महाग? स्वदेशी कोरोना लस Covaxin लशीची किंमत पाहा

मोदी सरकारनं कोव्हिशिल्ड (covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) दोन्ही कोरोना लशींचे डोस खरेदी केले आहेत.

मोदी सरकारनं कोव्हिशिल्ड (covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) दोन्ही कोरोना लशींचे डोस खरेदी केले आहेत.

मोदी सरकारनं कोव्हिशिल्ड (covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) दोन्ही कोरोना लशींचे डोस खरेदी केले आहेत.

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतात दोन कोरोना लशींना (corona vaccine) आपात्कालीन मंजुरी दिल्यानंतर आता कोरोना लसीकरण कार्यक्रमाला (corona vaccination) वेग आला आहे. 16 जानेवारीला भारतात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी सरकारनं लस उत्पादक कंपन्यांशी करार करून लशीचे डोसही खरेदी केले आहेत. कोव्हिडशिल्डनंतर (covishield) आता कोवॅक्सिनची (Covaxin) किंमतही जारी करण्यात आली आहे.

कोव्हिशिल्डनंतर सरकारनं कोवॅक्सिन लशीसाठीही खरेदी करार केला आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकनं तयार केलेली ही स्वदेशी लस. या लशीचा एका डोस 295 रुपयांना आहे. टॅक्स वगैरे धरून ही किंमत जवळपास 309 रुपयांपर्यंत आहे. 12 राज्यांमध्ये ही लस पुरवली जाईल. यासाठी 38.5 लाख डोस लागतील. भारत बायोटेकला दोन दिवसांत इतके डोस सरकारला पुरवायचे आहेत.

मेड इन इंडिया कोरोना लस ही यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे. देशातील लसीकरणात कोव्हिडशिल्ड लशीला प्राधान्य दिलं जाणार आहे. कोवॅक्सिन ही लस बॅकअपला असेल. जर नव्या कोरोनाचा उद्रेक झाला किंवा गरज पडली तर ही लस दिली जाईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - कोरोना लशीसाठी घाई कराल तर खबरदार! PM मोदींची राजकारण्यांना तंबी

दरम्यान कोविशिल्ड  लशीच्या एका डोसची किंमत 220 रुपये आहे.  ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार  केली आहे.

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.  पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus