या देशातही दिली जाणार मेड इन इंडिया कोरोना लस; COVAXIN बाबत भारत बायोटेकचा करार

या देशातही दिली जाणार मेड इन इंडिया कोरोना लस; COVAXIN बाबत भारत बायोटेकचा करार

भारतात तयार करण्यात आलेली कोरोना लस (Made in india corona vaccine) फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही दिली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतात तर स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनच्या (COVAXIN) आपात्कालीन वापराला मंजुरी मिळालीच आहे. पण आता परदेशातही ही मेड इन इंडिया लस दिली जाणार आहे. ब्राझीलला कोवॅक्सिन लस पुरवली जाणार आहे. ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकनं (Bharat biotech) ब्राझीलशी करार केला आहे.

ब्राझीलची Precisa Medicamentos कंपनीच्या टीमनं गेल्या आठवड्यात भारत बायोटेकला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी कोरोना लशीची मागणी केली होती. ब्राझीलची गरज लक्षात घेत भारतानं मदतीचा हात पुढे केला आहे. भारत बायोटेकनं ब्राझीलमधील Precisa Medicamentos शी करार केला.

भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी सांगितलं, कोरोना महासाथीमुळे अनेकांवर परिणाम झाला आहे. कंपनी म्हणून सार्वजिनिक आरोग्य जपणं ही आमची जबाबदारी आहे. जगासाठी लस विकसित करणं हेच ध्येय आम्ही कायम ठेवलं होतं. ज्यांना गरज त्यांना लस पुरवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आमची कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि भारताची ही लस आम्ही ब्राझीलमधील सार्वजनिक आरोग्यात कामी येत आहे, याचा आम्हालाही खूप आनंद आहे"

हे वाचा - 'लशीमुळे कोरोनापासून सुरक्षा मिळेल पण...', WHO ने व्यक्त केली चिंता

हैदराबादच्या भारत बायोटेकनं तयार केलेली COVAXIN म्हणजेच BBV152 ही लस.  कोवॅक्सिनला भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकार भारत बायोटेककडून ही लस खरेदी करणार आहे. या लशीचा एका डोस 295 रुपयांना आहे. टॅक्स वगैरे धरून ही किंमत जवळपास 309 रुपयांपर्यंत आहे. 12 राज्यांमध्ये ही लस पुरवली जाईल. यासाठी 38.5 लाख डोस लागतील. भारत बायोटेकला दोन दिवसांत इतके डोस सरकारला पुरवायचे आहेत.

हे वाचा - सरकारी नाही पण वैयक्तिकरीत्या कोरोना लस घ्यायची असल्यास किती पैसे मोजावे लागणार?

या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं याआधी जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता. ही लस यूकेत (UK) आढळलेल्या  नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे.

Published by: Priya Lad
First published: January 12, 2021, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading