VIDEO : तुम्हाला खूप राग आला आहे? या 'भडास कॅफे'मध्ये बिनधास्त करा तोडफोड

VIDEO : तुम्हाला खूप राग आला आहे? या 'भडास कॅफे'मध्ये बिनधास्त करा तोडफोड

राग आला की 10 पासून उलटे आकडे म्हणावेत, म्हणजे राग निघून जातो, असं म्हटलं जातं. पण तुम्ही एखाद्या कारणामुळे चिडला आहात, तुमचा राग आतल्या आत धुमसतो आहे, असं असेल तर मात्र या उलट्या आकड्यांचा उपाय पुरेसा होत नाही. यासाठी आहे हा 'भडास कॅफे'चा उपाय

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : राग आला की 10 पासून उलटे आकडे म्हणावेत, म्हणजे राग निघून जातो, असं म्हटलं जातं. पण तुम्ही एखाद्या कारणामुळे चिडला आहात, तुमचा राग आतल्या आत धुमसतो आहे, असं असेल तर मात्र या उलट्या आकड्यांचा उपाय पुरेसा होत नाही.

तुम्ही घरातल्या एखाद्या कारणामुळे चिडला असाल, ऑफिसमधल्या कटकटींनी हैराण असाल किंवा तुमचं ब्रेक अप झालं असेल तर... ?

तर चिंता करू नका, राग मनातल्या मनात धरू नका. तुमचा हा राग बाहेर काढण्यासाठी एक उपाय आहे. इंदौरमध्ये सुरू झालं आहे, भारतातलं पहिलंवहिलं 'भडास कॅफे'.

ही भडास कॅफे सुरू करणारे अतुल मलिक रामजी म्हणतात, मी जेव्हा नोकरी करायचो तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडचिड व्हायची. मग मी घरी सामान फोडायचो.

मग मनात आलं, माझ्यासारखे असे असंख्य लोक असतील की ज्यांना राग आवरत नसेल. तो त्यांच्या मनातून बाहेर काढण्याची गरज आहे. याच कल्पनेतून मी अँगर रूमची निर्मिती केली.

त्यांच्या या अँगर रूममध्ये काही सामान ठेवलेलं असतं. तुमचा राग बाहेर काढण्यासाठी तुम्ही खुशाल या सामानाची तोडफोड करू शकता !

जर तुम्ही बॉसवर नाराज असेल तर इथे टेबल खुर्चीचा ऑफिसचा सेट अप लावलेला असतो. तुम्ही तुमचा नवरा किंवा बायकोवर रागावला असाल तर घराचा सेटप असतो. तिथे तुम्ही कुणाचीही पर्वा न करता तोडफोड करू शकता.

IND vs NZ : इतिहास सांगतो रिझर्व्ह डेला भारतच जिंकतो, 'हा' घ्या पुरावा

तुमचं ब्रेक अप झालं असेल तर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो पंचिंग बॅगवर लावून त्याला ठोसे मारू शकता !

इंदौरमध्ये सुरू झालेल्या या 4 हजार चौ. फुटाच्या कॅफेमध्ये एक साउंड प्रूफ रूमही आहे. तिथे तुम्ही रागाने कितीही आरडाओरडा केलात तरी परवानगी आहे.

तणाव घालवण्याचे उपाय

या भडास कॅफेमध्ये राग काढण्याचे फक्त विघातक उपाय आहेत,असंही नाही. तुमचा राग, तणाव घालवायचा असेल तर इथे म्युझिक रूम आणि लायब्ररीही आहे. इथे वाद्य वाजवून किंवा वाचन करूनही तुम्ही रिलॅक्स होऊ शकता.

तुमच्याशी बोलण्यासाठी इथे मानसशास्त्रज्ञही आहेत. त्यांच्या मते, एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून ठेवला तर तणाव वाढतो. या तणावामुळे आजारही वाढीला लागतात.

त्यामुळेच तणावमुक्त होण्यासाठी तुमच्या रागाला वाट करून देणंही महत्त्वाचं आहे. या भडास कॅफेमध्ये येणाऱ्यांचा अनुभव याबाबतीत ऐकण्यासारखा आहे. अशा काही उपायांनी खरंच मनातल्या रागाचा निचरा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

या भडास कॅफेची काही दृश्यं पाहिलीत तरी तुमचा राग जातोय का ते पडताळून पाहायला काय हरकत आहे ?

====================================================================================

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading