Home /News /lifestyle /

खोट्या ईमेलपासून सावधान; बँकिंग फ्रॉडबाबत RBIचा इशारा

खोट्या ईमेलपासून सावधान; बँकिंग फ्रॉडबाबत RBIचा इशारा

RBIकडून अनेकदा ऑनलाईन बँकिंगबाबत इशारा देण्यात आला आहे. परंतु ज्या वेगाने लोक इंटरनेट बँकिंगच्या दिशेने जात आहेत, त्याच वेगाने बँकेसंदर्भात फ्रॉड, फसवणूकचं प्रमाणही वाढतं आहे.

  नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India लोकांना बँक फ्रॉडपासून वाचवण्यासाठी अनेक कॅंपेन चालवत आहेत. RBIकडून अनेकदा ऑनलाईन बँकिंगबाबत इशारा देण्यात आला आहे. परंतु ज्या वेगाने लोक इंटरनेट बँकिंगच्या दिशेने जात आहेत, त्याच वेगाने बँकेसंदर्भात फ्रॉड, फसवणूकचं प्रमाणही वाढतं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, ऑनलाईन फसवणूक आणि बँकिंगसंबंधी सर्व व्यवहारांच्या माहितीबाबत ग्राहकांना जागरुक करत आहे. आरबीआयने, RBIच्या नावाने येणाऱ्या ईमेलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयच्या नावाने येणारे ईमेल ग्राहकांच्या बँक अकाऊंटमध्ये असलेली कमाई खाली करु शकतात. असे येतात खोटे ईमेल आरबीआयने ग्राहकांना त्यांच्या नावे काही खोटे-बनावट ईमेल पाठवले जात असल्याचं सांगितलं आहे. या ईमेलमध्ये ग्राहकाला तुम्ही बक्षिस जिंकलं असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर लाखो रुपयांचं बक्षिस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर काही चार्जेस पैशांच्या रुपात मागितले जातात.

  हे वाचा - कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी, ऍपल, मायक्रोसॉफ्टकडून धोक्याचा इशारा

  भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे की, त्यांच्याकडून अशाप्रकारचे कोणतेही ईमेल किंवा मेसेज कधीही पाठवले जात नाहीत. आरबीआयकडून कधीही लॉटरी जिंकल्याचे किंवा परदेशातून पैसे येण्यासारखी कोणतीही माहिती ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवली जात नाही. हे वाचामोबाईल बँकिंगचा वापर करत असल्यास सावधान; देशात सायबर फ्रॉडच्या संख्येत वाढ काय कराल रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे की, आरबीआयच्या नावाने खोटे ईमेल किंवा मेसेज पाठवणारे 'आरबीआय' किंवा 'रिझर्व्ह बँक' यासारख्या नावांचा वापर करतात. ज्याकडे ग्राहक अधिक लक्ष देत नाहीत. पण ग्राहकांना अशाप्रकारच्या फसवणूकीच्या प्रकारापासून वाचायचं असेल तर, आलेला ईमेल कोणत्या ऍड्रेस वरुन आला आहे याबाबत माहिती घेणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्टी संशयास्पद वाटल्यास ग्राहकांनी त्या ईमेलवर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. अशाप्रकारच्या कोणत्याही ईमेल, मेसेजला उत्तर न देण्याचंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या